ETV Bharat / state

Thane ZP Corruption case : ठाणे जिल्हा परिषद सदस्यानेच भ्रष्टाचार आणला उघडकीस; प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात

ठाणे जिल्ह्यातील म्हारळ या गावातील जिल्हा परिषदेच्या योजनेतील कामकाजासंदर्भात पैशाचा अपहार आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. त्या संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रकरण पोहोचले आहे. जिल्हा परिषद सदस्या कडूनच न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Thane ZP Corruption case
ठाणे झेडपी भ्रष्टाचार प्रकरण
author img

By

Published : Mar 13, 2023, 2:19 PM IST

Updated : Mar 13, 2023, 2:48 PM IST

मुंबई : ठाणे जिल्हा हा मुंबई जिल्ह्यानंतर विविध प्रकल्पांच्या नावाने ओळखला जातो. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मेट्रो तसेच इतर रस्ते मार्ग रेल्वे मार्ग याचे विविध प्रकल्प तसेच पंचायत राज ग्रामीण विकास याचे देखील अनेक प्रकल्पाचे काम सुरू आहे .परंतु या संदर्भात म्हारळ गाव, तालुका कल्याण या ठिकाणी पैशाचा अपहार आणि भ्रष्टाचार झाल्याबाबत ठाणे जिल्हा परिषदेच्या एका सदस्यानेच आवाज उठवला, आणि तक्रार केली त्यानंतर चौकशी केली गेली.पुढे मात्र लाल फीतीत प्रकरण अडकल्याची तक्रार आहे.

जिल्हा परिषद सदस्य यांनी जी तक्रार केली होती, त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की , वरील गावांमध्ये तालुका कल्याण येथे विविध योजना आणि प्रकल्पांच्या कामांमध्ये पैशाची देवघेव झालेली आहे. नियमबाह्य गोष्टी केल्या आहेत. भ्रष्टाचार झालेला आहे. आणि यासंदर्भात चौकशी करावी; अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार तालुका विकास अधिकारी कल्याण यांनी त्या संदर्भात चौकशी देखील केली.मात्र पुढे कारवाई थांबली.

कल्याण तालुका विकास अधिकारी यांनी यासंदर्भात नियमांतर्गत म्हरळ गावाच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात जो भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत तपास केला. चौकशी झाली, चौकशी मध्ये काही व्यक्ती या दोषी आढळले. परंतु इतके होऊनही कोणतीही अंमलबजावणी केली गेली नाही. चौकशीनंतर त्याबाबत एफ आय आर देखील नोंदवला गेला होता. परंतु ज्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेलेले आहे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई मात्र झालेले नाही. म्हणूनच आता त्या संदर्भात ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्याने आता कारवाई मध्ये राजकीय वरदहस्त आडवा येत असल्याने प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केले आहे.

कल्याण तालुक्यामध्ये ज्या गावात विकासाच्या नावाने योजना राबविल्या जात होत्या. त्यामध्येच भ्रष्टाचार झाला. आणि हा भ्रष्टाचार होताना जिल्हा परिषद सदस्य ठाणे यांनी हे पाहिले. त्याचे निरीक्षण केले. त्यामुळे त्यांनीच याबाबत स्वतःहून प्रशासकीय यंत्रणाकडे पाठपुरावा केला. मात्र पुढे दिरंगाई आडवी आल्याचेे त्यांनी याचिकेमध्ये नमूद केले आहे. यासंदर्भात न्यायालयामध्ये एकनाथ ढोकळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे .पुढील दोन दिवसात या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अधिवक्ता एकनाथ डोकळे यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी म्हटले की, जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा परिषद यांनी या संदर्भातली तक्रार केली होती. त्यांनी याचा पाठपुरावा केला. कल्याण तालुक्यांमध्ये म्हारळ या गावात भ्रष्टाचाराचे प्रकरण घडल्याची त्यांची तक्रार होती. याबाबत तालुका विकास अधिकारी यांनी चौकशी देखील केली. परंतु पुढील कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आता हे प्रकरण न्यायालयामध्ये याचिककर्त्यांनी दाखल केले आहे.

हेही वाचा : BMC News : मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी पालिकेने घेतला 'हा' निर्णय, वाचा सविस्तर

Last Updated : Mar 13, 2023, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.