ठाणे - देवस्थान आणि तीर्थस्थान महाराष्ट्रात अनेक आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात, पर्यावरणाचा संदेश देत ठाणे जिल्ह्याबाहेर प्रसिद्ध असलेली डोंगरातील आई म्हणून मुंब्रा देवी प्रसिद्ध आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनाच सावट पाहता यंदा मंदिर बंद असल्याने भाविकांना मनोभावे पूजाअर्चा करता येत नाही.
मुंब्रा देवीच्या मंदिराच्या निर्माणाचीे ही एक ऐतिहासिक कथा नाही तर अलीकडचीच वास्तविकता आहे. कपारीत असलेल्या या मुंब्रा देवीचे रस्त्यावरून जाणारे, लोकल ट्रेनमधून जाणारे या आईचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊनच पुढील प्रवास करीत असल्याची एक परंपरा आणि संस्कृती आहे. मुंब्रा देवीचे मंदिर जरी डोंगरात असले तरीही भाविक दर मंगळवारी आणि इतर दिवशीही दर्शनासाठी येतात आणि विसावतात. या मंदिराची स्थापना आणि निर्माण गावकऱ्यासोबत दिवंगत नाना भगत यांनी केली. मंदिराची निर्मिती शेकडो वर्षांपूर्वी करण्यात आली. आईची सेवा आणि मंदिराची देखभाल करण्यासाठी नाना भगत यांनी आई मुंब्रा देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. सध्या नाना भगत हे जरी यात नसले तरी आई मुंब्रा देवीच्या माध्यमातून ते सदैव भाविकांच्या स्मरणात आहेत.
दिवसेंदिवस मुंब्रा देवीच्या भाविकांमध्ये वाढ होत आहे. डोंगरात असल्याने सहसा येथे भाविक परिवारासह जास्त जात नव्हते. मात्र, मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था भगत यांनी केल्याने भाविक आता परिवारासह मंदिरात जाऊन आई मुंब्रा देवीचे दर्शन घेतात. या मंदिराची विशेषतः महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी एकाच जागेवर नऊ देवींच्या रूपांचे दर्शन लाभते. यामुळे शक्तीपीठाचे दर्शनाचा लाभ मिळतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक आज या मंदिराकडे वळत आहेत.
वाढत्या भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी गावकरी आणि स्वयंसेवक मोठ्या भक्तीने येणाऱ्या भक्तांची सेवा कुठलाही स्वार्थ न ठेवता करतात. या मंदिराला 750 पायऱ्या आहेत. भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर नवसाप्रमाणे कुणी गुडघ्यावर चालत येतात तर काही भाविक नवसाप्रमाणे प्रत्येक पायरीवर कापूर प्रज्वलित करून मंदिरात पोहोचतात. या मंदिराची आठवण राहावी म्हणून शालेय शिक्षणात ही या मंदिराबद्दल माहिती देण्यात आली आहे.
ठाण्यातील मुंब्रा भागातील मुंब्रादेवी हे मुघल ते इंग्रजांच्या काळातील प्राचीन देवस्थान आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या अगदी समोरून देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी पायवाट आहे. शेकडो वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असून तेव्हापासून भाविकांचे हे श्रद्धास्थान बनले आहे. मुंब्रा शहर हे मुंब्रा देवीच्याच नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरात नवदुर्गाचे दर्शन भाविकांना घेता येत उंच डोंगरात व निसर्गाच्या कुशीत असलेले हे मुंब्रा देवीचे मंदिर, या मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवात लाखो भाविक गर्दी करत असतात. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने यंदा भाविकांनी येथे गर्दी केली नाही.
हेही वाचा - अॅक्मे रेंटल: इमारतीतील रहिवाशांना गैरसोय, पालिकेविरुद्ध मूक आंदोलन