मीरा भाईंदर - ठाणे जिल्ह्यातील १२ वर्गापर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालय १४ ते १५ जुलै बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मात्र, भाईंदर पूर्वेच्या इंद्रालोक परिसरातील फेस-सहा मधील आर. बी. के. शाळा नेहमीप्रमाणे भरली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पूर्ण वर्ग शाळेतील भरले असून सर्व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. अनेक शाळेतील प्रशासनाकडून पालकांना काल फोनद्वारे, मेसेजद्वारे शाळा बंद असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, आर. बी. के. शाळेकडून पालकांना अश्या कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी नेहमी प्रमाणे शाळेत हजर झाले. मिळालेल्या माहितीनुसार नयानगरमधील बानेगर शाळा, कनकिया मधील आर. बी. के. शाळा अधिक दोन ते तीन शहरातील शाळा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावून विषय संपुष्टात आणणार - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला. आणि हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सपूर्ण रात्रभर मीरा भाईंदर शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू ठेवणे धोक्याचे आहे. या शाळेमध्ये गेलेल्या मुलांचा जीव धोक्यात असून भविष्यात काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आता पालिकेच शिक्षण विभाग कारणे दाखवा नोटीस बजावून विषय संपुष्टात आणणार आहे. परंतु, तसे न करता अश्या बेजबाबदार शाळेवर कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
मनमानी कारभार - या संदर्भात शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, आम्हाला शाळेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. नेहमी प्रमाणे मुले शाळेत गेली. आम्ही विचारपूस केली तर उत्तर दिले नाही. या शाळेतील शिक्षक, प्रशासन मनमानी कारभार करत आहे. शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी पालकांनी केली आहे.
हेही वाचा - Koyna Dam: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये 270 मिलीमीटर पाऊस