ETV Bharat / state

रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने वृध्द व्यक्तीचा मृत्यू - भाईंदर पश्चिम बातमी

भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका वृद्ध रुग्णाचा शताब्दी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय
पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय
author img

By

Published : Jul 5, 2020, 11:00 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने एका वृद्ध रुग्णाला तब्बल 14 तास भर पावसात रुग्णालयाच्या बाहेर बसून रहावे लागले. यामुळे, त्या वृद्धव्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्या प्रतिक्रिया देताना

मिरारोडच्या पेनकर पाडा परिसरात राहणारे हेमंत सावे (वय 55 वर्षे) यांना शुक्रवारी (दि. 3 जुलै) रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे स्थानिक समाजसेवकांनी आरोग्य विभागाला कळवले. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही. रुग्णालयाच्या बाहेर रात्रभर पावसात भिजत ही व्यक्ती तडफडत होती.

शनिवारी (दि. 4 जुलै) सकाळी 11 वाजण्याच्या वृद्ध रुग्णाच्या पत्नी रुग्णालयात भेटण्यासाठी गेले असता धक्कादायक बाब समोर आली. रुग्णालयांच्या बाहेर असलेल्या कठाड्यावर आपला नवरा बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. माझ्या पतीला तात्काळ रुग्णालयात घ्या, त्यांच्यावर उपचार करा, अशी विनवणी करत राहिली. पण, हा दारुडा आहे, म्हणून याला इथे प्रवेश नाही आहे निघून जा, असे उत्तर रुग्णालयातून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला रिक्षातून शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तक्रारपत्र
तक्रारपत्र
यापूर्वीही पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अनेक भोंगळ कारभार समोर आले आहेत. या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. वेळेत उपचार झाले असते तर या व्यक्तीचा मृत्यू झाला नसता. शासकीय रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मग उपचार का झाले नाही, चालकाने रुग्णालयात दाखल का केले नाही?, या मृत्यूस जबाबदार कोण.?, असे विविध प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत.

याप्रकरणी समाजसेवक सोमनाथ पवार यांनी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार सोमनाथ पवार यांनी दिला आहे.

जर लहान बालक आणि वयोवृद्ध माणूस असेल तर त्याच्या सोबत कुटुंबातील एक सदस्य असले पाहिजेत. या रुगांची माहिती रुग्णवाहिका चालकाने रुग्णालयला दिली नाही. या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. बाळासाहेब आरसुलकर यांनी दिली. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

हेही वाचा - 'राज्य सरकारने कल्याण डोंबिवलीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.