ETV Bharat / state

आदिवासी मुलीचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर शवचिकित्सेसाठी काढला उकरून

शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या अंजली गुरुनाथ पारधी (वय 16 रा. रास) या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर घडली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह जमिनीत पुरून परस्पर अंत्यसंस्कार केले. मात्र,  ही घटना आश्रम शाळा प्रशासनाला तसेच पोलिसांनाही कळविण्यात आली नव्हती. आत्महत्येच्या प्रकरणाने संशय निर्माण झाल्याने तिचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जमिनी बाहेर काढण्यात आला आहे.

आदिवासी मुलीचा मृतदेह तब्बल 9 दिवसानंतर शवचिकित्सेसाठी काढला उकरून
author img

By

Published : Sep 20, 2019, 8:54 PM IST

Updated : Sep 20, 2019, 10:07 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर घडली होती. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनंतर या मुलीचा जमिनीत पुरलेला मृतदेह चौकशीसाठी बोहेर काढण्यात आला आहे. अंजली गुरुनाथ पारधी (वय 16 रा. रास) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

हेही वाचा - ठाण्यात कंटेनर चढला दुभाजकावर; वाहनांच्या लांबच लांब रांगा

अंजली गणपती उत्सवासाठी गावी गेली होती. तिथे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. खळबळजनक बाब म्हणजे, तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह जमिनीत पुरून परस्पर अंत्यसंस्कार केले. मात्र, ही घटना आश्रम शाळा प्रशासनाला तसेच पोलिसांनाही कळविण्यात आली नव्हती. गणपती उत्सवाची सुट्टी संपल्यानंतर अंजली नियमित शाळेत आली नसल्याने शाळा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याची घटना तब्बल नऊ दिवसानंतर उघडकीस आली. या आत्महत्येच्या प्रकरणाने संशय निर्माण झाल्याने तिचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जमिनीबाहेर काढण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची वाशिंद पोलिसांमार्फत चौकशी सुरू झाली आहे. शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या चार वर्षात शहापूर तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये आत्तापर्यंत तब्बल दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, आत्महत्या तसेच इतर अपघाती कारणांमुळे झाला आहे. ही आकडेवारी पाहता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Intro:kit 319

Body:आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची संशयास्पद आत्महत्या ;
9 दिवसानंतर जमिनीत पुरलेला मृतदेह शवचिकित्सेसाठी काढला उकरून

ठाणे : शहापूर तालुक्यातील कुल्हे शासकीय आश्रम शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने गणेशोत्सवाच्या सुटीसाठी गावी गेलेली असताना आत्महत्या केल्याची घटना बुधवारी अकरा तारखेला घडली होती, त्यानंतर ही धक्कादायक घटना तब्बल नऊ दिवसांनी उघडकीस आल्यानंतर मृतक कुटुंबीयांची चौकशी करून तहसीलदार आणि वशिंद पोलिसांनी जमिनीत पुरलेला तिचा मृतदेह वैद्यकीय शवचिकित्सेसाठी जमिनीतून उकरून बाहेर काढण्यात आला आहे, आता वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे, तर आश्रम शाळा विद्यार्थीनीच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे,

कुल्हे शासकीय आश्रम शाळेत दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघड झाले असतानाच गेल्या चार वर्षात शहापूर तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये आतापर्यंत तब्बल दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, आत्महत्या तसेच इतर अपघाती कारणामुळे झाला आहे, ही आकडेवारी पाहता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,
कु. अंजली गुरुनाथ पारधी (वय 16 रा. रास ) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती, अंजली गणपती उत्सवासाठी गावी गेली होती , तेथे तिने बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, खळबळजनक बाब म्हणजे तिच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह जमिनीत पुरून अंत्यसंस्कार केले, मात्र ही घटना आश्रम शाळा प्रशासनाला तसेच पोलिसांनाही कळविण्यात आली नव्हती, गणपती उत्सवाची सुट्टी संपल्यानंतर अंजली नियमित शाळेत आली नसल्याने शाळा प्रशासनाने चौकशी केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याची घटना तब्बल नऊ दिवसानंतर उघडकीस आली, या आत्महत्येच्या प्रकरणाने संशय निर्माण झाल्याने तिचा पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जमिनी बाहेर काढण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची वाशिंद पोलिसांमार्फत चौकशी सुरू झाली आहे , शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे,
दरम्यान, गेल्या चार वर्षात शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळा मध्ये आतापर्यंत तब्बल दहा आदिवासी मुला-मुलींचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या दप्तरी शासकीय आश्रम शाळेतील चार वर्षाच्या शैक्षणिक वर्षात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची अनेक कारणे नमूद करण्यात आली आहेत, त्यामध्ये आजार, सर्पदंश, गळफास , विष प्राशन, अपघात अशी अन्य कारणे लेखी स्वरूपात नोंद करण्यात आली आहेत , यातील बऱ्याच मुला-मुलींचे मृत्यू घरी , आश्रम शाळेत व उपचारादरम्यान रूग्णालयात झाल्याची नोंद आहे , आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींच्या मृत्यूची ही धक्कादायक आकडेवारी पाहता आदिवासी मुला मुलींची आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे समोर आले आहे, त्यातच वेगवेगळ्या कारणांनी हा मृत्यू ओढवल्याने आदिवासी मुलांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी आश्रम शाळा व्यवस्थापन घेते की नाही , असे अंजलीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेवरून पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे,

Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.