ETV Bharat / state

Killing Youth In Thane District: तरुणाची निर्घृण हत्या! मृतदेह गोणीत भरून फेकला तलावात - Killing Youth

अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावातील आयप्पा मंदिराच्या तलावात दगडाने बांधून गोणीत भरललेल्या अवस्थेत एक मृतदेह तलावात आढळून आला. ( Killing Youth In Thane District ) याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. तर अंबरनाथ शहरात पुन्हा एका तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशाल राजभर ( २०, रा. हनुमाननगर, उल्हासनगर) असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तरुणाची निर्घृण हत्या
तरुणाची निर्घृण हत्या
author img

By

Published : Aug 5, 2022, 4:14 PM IST

ठाणे - एका २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेह गोणी भरला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला दगडाने बांधून गोणीत भरललेल्या अवस्थेत तलावात आढळून आला. ( Brutal Killing Youth In Thane District ) ही घटना अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावातील आयप्पा मंदिराच्या तलावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. तर अंबरनाथ शहरात पुन्हा एका तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विशाल राजभर ( २०, रा. हनुमाननगर, उल्हासनगर) असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आयप्पा मंदिर तलाव

मृतदेहाच्या मानेला, पायाला मोठ मोठाले दगड बांधून फेकले तलावात - मृत विशाल हा उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील हनुमाननगर भागात राहणारा होता. काल (४ जुलै) रोजी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावातील आयप्पा मंदिराच्या तलावात असलेल्या एका गोणीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्याच्या मृतदेहाच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्यारांनी वार केलेले पोलिसांना आढळून आले. ( 20-Year-Old Youth Was Killing ) कोणीतरी अज्ञात आरोपीने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह तीन-चार दिवसापूर्वी गोणीत बांधून मृतदेहाच्या मानेला, पायाला मोठ मोठाले दगड बांधून मृतदेह आयप्पा मंदिराच्या तलावात फेकून देण्यात आल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. दुसरीकडे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने भयानक कृत्य केले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत - दरम्यान दगडाने बांधल्याने हा मृतदेह तलावाच्या तळाशी गेला होता. अंबरनाथ पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या मदतीने विशालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विशाल मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने उत्तरणीय तपासणीसाठी मुंबईतील जे. जे रुग्णालयात रवाना केला. अंबरनाथ पोलीस ठाण्यात विशालच्या हत्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात मारेकऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. मात्र, ही निर्घृण हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अजून पोलीस तपासात स्पष्टपणे समोर आले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

आठवडाभरात दोन हत्या - खळबळजनक बाब म्हणजे अंबरनाथमध्ये आठवडाभरापूर्वीच शुक्रवारी (29 जुलै) दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराचा थरारक पाहायला मिळाला होता. शिवाजीनगर परिसरात दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांवर आधी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तुषार गुंजाळ नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला तर गणेश गुंजाळ या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, अंबरनाथ शहरात आठवडाभरात दोन हत्या झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - काँग्रेसने 70 वर्षात कमावले ते भाजपने 8 वर्षात गमावले; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.