ETV Bharat / state

सेंट्रल मैदानातून पुन्हा भाजी मंडईचे स्थलांतर, तीन रस्त्यांवर आता भरणार मंडई - central ground

रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. तसेच नागरीकांनी सोशल डिसेन्टीसींगचा नियम पाळावा, असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

thane lockdown
सेंट्रल मैदानातून पुन्हा भाजी मंडईचे स्थलांतर तीन रस्त्यांवर आता भरणार मंडई
author img

By

Published : Apr 3, 2020, 7:40 AM IST

ठाणे - कोरोना विषाणुचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र, येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर अवघ्या दोनच दिवसात येथील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे आता जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार पासून येथील तीन रस्त्यांवर त्यांना विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.ॉ

जांभळी नाका ते स्टेशनपर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. त्यामुळे येथील 400 भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर पालिकेने बुधवार पासून सेंट्रल मैदानात केले होते. परंतु, बुधवारी काही प्रमाणात तेथे गर्दी दिसून आली. मात्र गुरुवारी या ठिकाणी नागरीकांनी सोशल डिस्टेन्टसचा कोणताही नियम पाळला नसल्याचेच दिसून आले. पोलीस आणि पालिकेचे अधिकारी आवाहन करुनही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यानुसार गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर दुसरा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. त्यानुसार जांभळी नाका भागातील तीन रस्ते आता यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता येथील सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौकातील रस्ते यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने गुरुवारी या तीन्ही रस्त्यांवर मार्कींग करण्याचे काम सुरू केले होते.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. तसेच नागरीकांनी सोशल डिसेन्टीसींगचा नियम पाळावा, असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याशिवाय गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहनही पालिकेने केले आहे. दरम्यान, आता शुक्रवारपासून या तीन्ही रस्त्यांवर पहाटे पाच ते सकाळी 10 वाजेर्पयत भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.