ETV Bharat / state

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात

author img

By

Published : Oct 4, 2020, 5:47 PM IST

कोरोना संसर्गामुळे 24 सप्टेंबरला मंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 10 दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. यानंतर आज (रविवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

thane urban development minister eknath shinde cure from corona
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची कोरोनावर मात

ठाणे - राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील नर्स आणि डाॅक्टर यांनी एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला.

मंत्री एकनाथ शिंदे यांना 24 सप्टेंबरला कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्णालयात असताना कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे आपल्यामुळे अडून राहू नये, म्हणून त्यांनी रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच काही कागदपत्रे हातावेगळी करून स्वाक्षऱ्या केल्या. आपली तब्येत सुधारत असून आपण लवकरच परत जनसेवेकरिता रुजू होऊ, असेही ते म्हणाले होते.

मंत्री शिंदे यांचा कोरोनाची लागण झाली, याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. 10 दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. यानंतर आज (रविवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

याआधी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे. तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.