ETV Bharat / state

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मद्य प्राशन करुन शिवीगाळ; मराठा आंदोलकांचा आरोप - OBC leader Laxman Hake - OBC LEADER LAXMAN HAKE

OBC Leader Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मागील काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात चर्चेत आहेत. मात्र, आता ते एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. वाचा संपूर्ण बातमी....

OBC leader Laxman Hake
लक्ष्मण हाके (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:42 PM IST

Updated : Sep 30, 2024, 10:53 PM IST

पुणे OBC Leader Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मद्य प्राशन करत असल्याचं एका व्हिडिओत दिसत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात त्यांनी मद्य प्राशन केलं. तसंच त्यांनी शिवीगाळही केली असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय.

हाकेंनी केली शिवीगाळ? : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली होती. याला विरोध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारलं होतं. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देवू नये, यासाठी हाके हे अनेकवेळा उपोषणाला देखील बसले होते. तेव्हापासून हाके हे नाव राज्यात चर्चेत आलं. मात्र, आता पुण्यात त्यांचा एक नवीनच प्रताप समोर आलाय.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Source - ETV Bharat Reporter)

मराठा समाज आक्रमक : पुण्यातील कोंढवा परिसरात लक्ष्मण हाके हे मद्य प्राशन करत होते. मद्य प्राशन करुन त्यांनी शिवागाळ केली, असा आरोप पुण्यातील मराठा आंदोलकांनी केलाय. त्यामुळं आता हाके यांच्यावर टीका होत आहे. मद्य प्राशन करुन गोंधळ घालत असल्याचा हाके यांचा एक व्हिडिओ समोर आलाय.

आरोप-प्रत्यारोप : एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी धरल्याचं दिसून येतंय. या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलिस ठाण्यात पोहचले असून, एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणं सुरु आहे. लक्ष्मण हाके यांची मेडिकल चाचणी करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली. तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

हेही वाचा

  1. कुणबी दाखला मिळवणं आता सोप्पं; कसं ते जाणून घ्या... - Chandrakant Patil On Reservation
  2. कोल्हापुरात बिबट्या आल्याचा गैरसमज आणि वनविभागाची तारांबळ, गुरगुरणारा निघाला कुत्रा - Leopard in Kolhapur
  3. "जनतेत संभ्रमावस्था पसरवू नये...", नितीन गडकरींच्या 'त्या' विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Devendra Fadnavis On Nitin Gadkari

Last Updated : Sep 30, 2024, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.