ETV Bharat / state

मोबाईल चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या टोळीतील दोघांना अटक; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त - Mobile shop theft In Nagpur - MOBILE SHOP THEFT IN NAGPUR

Mobile shop theft In Nagpur : नागपूर शहरातील मोबाईल शॉप फोडून 24 लाख 32 हजार रुपये किमतीचे 89 मोबाईल फोन चोरले होते. पोलिसांनी धकड कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तीसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

Mobile shop theft In Nagpur
मोबाईल चोरी दोघांना अटक (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:43 PM IST

नागपूर Mobile shop theft In Nagpur : नागपूर शहर पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 17 लाख 18 हजार रुपयांचं मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मोबाईल शॉपचं शटर तोडून 24 लाख 32 हजार रुपये किमतीचे 89 मोबाईल फोन चोरले होते. 100 हून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासत पोलिसांनी ही कारवाई केली. तीसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

तक्रारदार सचीन दामोदर गांवडे यांचं सर्वश्री नगर, दिघोरी उमरेड रोड येथे संतकृपा प्रोव्हजन्स नावाचं शॉप आहे. 13 सप्टेंबर रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी निघुन गेलो. शोरुम मालक दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी शोरुम उघडण्यासाठी सकाळच्या सुमारास आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. दुकानातील शटर उघडुन पाहणी केली, असता दुकानातील एकूण 89 मोबाईल फोन आणि महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. तसंच गल्ल्यातील नगदी मिळून 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

100 सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध : चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकानं आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तापसले. दरम्यान हे आरोपी उत्तरप्रदेशच्या गाजीयाबादचे रहिवासी असल्याचं समजल्यानंतर पोलिसांच्या पथकानं आरोपांच्या ठिकाणावर 24 तास पाळत ठेवत कारवाई केली.

तीन पैकी दोन आरोपी अटक, 72 मोबाईल जप्त : पोलिसांच्या पथकानं तीन आरोपींपैकी एका आरोपीला सिनेस्टाईल पध्दतीनं बेडया ठोकल्या. चौकशी दरम्यान त्यानं दुसरा आरोपी मोहम्मद शहजादची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद शहजादला अटक केली. तीसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे. आरोपींनी मोबाईल शॉपीमधून चोरी केलेले मोबाईल हे गाजीयाबाद येथील डासना या गावात लपवून ठेवले होते.

हेही वाचा

  1. कुणबी दाखला मिळवणं आता सोप्पं; कसं ते जाणून घ्या... - Chandrakant Patil On Reservation
  2. कोल्हापुरात बिबट्या आल्याचा गैरसमज आणि वनविभागाची तारांबळ, गुरगुरणारा निघाला कुत्रा - Leopard in Kolhapur
  3. "जनतेत संभ्रमावस्था पसरवू नये...", नितीन गडकरींच्या 'त्या' विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Devendra Fadnavis On Nitin Gadkari

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.