ठाणे - शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोनाचे 146 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शुक्रवारी उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला असून 19 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या गुणकाराला पालिका प्रशासनाने रोखले आहे. शुक्रवारी ठाण्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीत 6 नव्या रुग्णांची वाढ, तर वर्तकनगर प्रभाग समितीत 12 नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे.
लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत 22 नवे रुग्ण सापडले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ही 31 एवढी आहे. उथळसर प्रभाग समितीत शुक्रवारी 14 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. तर वागळे प्रभाग समितीत मात्र 20 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. कळवा प्रभाग समितीत नव्या 21 रुग्णांची भर शुक्रवारी पडली आहे. तर मुंब्रा प्रभाग समितीत 17 नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे. तर दिवा प्रभाग समितीत मात्र 2 रुग्णांची वाढ झाली आहे. तर त्यात बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
ठाण्यात शुक्रवारी एकूण 146 रुग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. तर आतापर्यंत 79 जणांचा म्रृत्यू झाला आहे. यात 57 पुरुषांचा समावेश असून 22 महिला आहेत.