ETV Bharat / state

आठवडाभरात मेट्रोचे अनावश्यक बॅरिकेट्स हटवा; अन्यथा आंदोलन, मनसेचा इशारा

मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे नागरिकांना अनेक गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. यामुळे आठवडाभरात अनावश्यक बॅरिकेट्स काढून न टाकल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 17, 2019, 10:22 PM IST

मेट्रोच्या कामाची पाहणी करतांना मनसेचे कार्यकर्ते

ठाणे - मेट्रोच्या अनावश्यक लावलेल्या बॅरिकेट्समुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूकची कोंडी होत असल्याने नागरिकांची असुविधा होत आहे. यामुळे मेट्रोचे अनावश्यक बॅरिकेट्स काढून टाकावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यावर आठवडाभरात बॅरिकेट्स काढण्याची कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

मेट्रोच्या कामासाठी तीन हात नाक्यापासून घोडबंदर पट्ट्यात लावण्यात आलेल्या पत्र्याच्या बॅरिकेट्समुळे नागरिकांना अनेक गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. सोमवारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॅडबरी नाका या ठिकाणी जाऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. या बॅरिकेट्समुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. याशिवाय ही जागा मद्यपीचा अड्डा देखील झाल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

thane-remove-metros-unnecessary-barricades-within-a-week-otherwise-will-protest-mns
मेट्रोच्या पत्र्यांवर काळं फासताना मनसेचे कार्यकर्ते

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. ठाण्यात तीन हात नाक्यापासून ते घोडबंदर पट्ट्यातून मेट्रो जाणार आहे. या कामांसाठी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संपूर्ण घोडबंदर पट्ट्यात काही ठिकाणी मुख्य हायवेवर तर काही ठिकाणी सर्व्हिस रोडवर पत्र्याचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. परिणामी मुख्य हायवे अरुंद झाला असून वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करून आवश्यक असलेल्या ठिकाणीच बॅरिकेट्स लावण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र अजूनही बॅरिकेट्स तसेच ठेवण्यात आले असून त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हे बॅरिकेट्स सहा महिन्यांपासून केवळ लावण्यात आले असून, येथे अजून कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही. त्यामूळे प्रत्यक्षात जेव्हा मेट्रोचे काम सुरू करण्यात येईल त्याचवेळी हे बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. सोबतच एका आठवड्यात हे अनावश्यक बॅरिकेट्स काढण्यात यावे अन्यथा मनसे स्वतः हे बॅरिकेट्स काढेल असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

Intro:ठाण्यात मनसेचे मेट्रोच्या पत्र्यांच्या विरोधात आंदोलन आठवड्यात अनावश्यक पत्रे न हटवल्यास आंदोलनाचा इशाराBody:मेट्रोच्या कामासाठी तीन हात नाक्यापासून घोडबंदर पट्ट्यात लावण्यात आलेल्या पत्र्याच्या बॅरिकेट्स मुळे नागरिकांना अनेक गैरसुविधांचा सामना करावा लागत असुन या विरोधात आज मनसेच्या वतीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.काम सुरू नसताना या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून एका आठवड्यात हे बॅरिकेट्स काढण्यात आले नाही तर मनसेचे कार्यकर्ते स्वतः हे बॅरिकेट्स काढतील असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे . जेव्हा प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू करण्यात येईल त्याच वेळी हे बॅरिकेट्स लावण्यात यावे अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून ठाण्यात तीन हात नाक्यापासून ते घोडबंदर पट्ट्यातुन मेट्रो जाणार आहे .या कामांसाठी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संपूर्ण घोडबंदर पट्ट्यात काही ठिकाणी मुख्य हायवेवर तर काही ठिकाणी सर्व्हिस रोडवर पत्र्याचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य हायवे अरुंद झाला नसून वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी करून आवश्यक असेल त्याच ठिकाणी बॅरिकेट्स लावण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र अजूनही बॅरिकेट्स तसेच ठेवण्यात आले असून त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आज मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॅडबरी नाका या ठिकाणी जाऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यामध्ये अनेक ठिकाणी कामे सुरू नसताना केवळ मेट्रोचे बॅरिकेट्स लावण्यात आले असून आतमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. याशिवाय ही जागा मद्यपी चा अड्डा देखील झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. सहा महिन्यांपासून केवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारचे काम सुरू नासल्याने एक आठवड्यात हे बॅरिकेट्स काढण्यात यावे अन्यथा मनसे स्वतः हे बॅरिकेट्स काढेल असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

Byte - अविनाश जाधव ( ठाणे-पालघर, जिल्हाध्यक्ष - मनसे ) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.