ठाणे - धुळवडीच्या दिवशी मध्यप्राशन करून जाणाऱ्या एका मद्यपीची भर रस्त्यात दोघांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस ( Police Investigation ) आले आहे. विशेष म्हणजे मृताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पोलिसांनी ( Police ) अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याची हत्या झाल्याचे समोर येताच पोलिसांनी २४ तासाच्या आतच आरोपीचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहे. मात्र, त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे. रुपराज उर्फ भाई राजा पाटील (वय २६ वर्षे), असे अटक ( Police Arrested One Accused ) केलेल्या आरोपीचे नाव असून निशान उर्फ बाळा हिरामण साठे हा आरोपी फरार झाला आहे. तर कुंदनमल दुलीचंद सुनगत ( वय ४१ वर्षे ), असे हत्या झालेल्या मद्यपीचे नाव आहे.
‘यामुळे’ पोलिसांना मृत्यू वाटला संशयास्पद - मृत कुंदनमल हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ मधील धोबीघाट परिसरात राहत होता. तो १८ मार्चला दुपारच्या सुमारास धुळवडच्या दिवशी मध्यप्रशान करुन घरी जात असताना त्याचा तोल जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईपलाईनवर पडला असावा, अशी माहिती मृताच्या भावाने पोलिसांना दिली. दुसरीकडे त्याचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुद्धावस्थेत असताना त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर मृताचा भाऊ राजू दुलीचंद सुनगतने दिलेल्या माहितीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना त्याचा मृत्यू संशयास्पद वाटत होता. त्यामुळे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी अकस्मात मृत्यूची सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, १८ मार्चला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धोबीघाट रस्त्याने पायी चालत जात असलेला मृत कुंदनमल याला दोन व्यक्तीने रस्त्याचे गाठून सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात मारल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.
हत्याचे कारण अद्यापही अस्पष्ट - या माहितीवरून पोलीस पथकाने परीसरात सखोल तपास करुन घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा शोध घेऊन त्याच्याकडे तपास केला असता आरोपी रुपराज उर्फ भाई राजा आणि निशान उर्फ बाळा या दोघांनी केलेल्या मारहाणीत कुंदनमलचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबऱ्याने दिलेली माहिती तसेच पोलिसांनी तपासलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या चौकशीतून त्या दोघांनीच कुंदनमल यास ठार मारल्याचे निष्पन्न झाले. यावरून प्रत्यक्षदर्शी निलेश नारायण आहेर (वय ३८ वर्षे, रा. वरणगांव, ता. कल्याण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात १९ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भा.दं.वि.चे कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच उल्हासनगर पोलिसांनी २४ तासांच्या आताच रूपराज उर्फ भाई राजा याला धोबीघाट परिसरातून शिताफीने अटक केली आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. मात्र, दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर हत्येचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ए. जी. जगताप करत आहेत.
हेही वाचा - Thane Crime News : धुळवडीचा रंग बेरंग; ठाण्यात तरुणाच्या डोक्यात टाकला दगड