ठाणे : ठाणे पालिकेच्या नौपाडा-कोपरी, उथळसर, दिवा, अशा विविध ठिकाणी नालेसफाईची कामे झाली. मात्र सदरची नालेसफाई वेळेत आणि मुदतपूर्व झालेली नाहीत. कोपरी-नौपाडा आणि उथळसर या दोन प्रभाग समितीत मे.जे. एस इन्फ्राटेक या कंपनीला पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काळ्या यादीत समाधानकारक खुलासा, अपुरे काम आणि कचरा न उचलल्याने काळ्या यादीत टाकले. या प्रभाग समितीत आयुक्तानी खुद्द पाहणी केलेली होती. दरम्यान अन्य प्रभाग समितीत यापेक्षाही अवस्था बिकट असल्याचे जीपीएस फोटोद्वारे दिसत आहे. पालिका आयुक्त या प्रभाग समितीचा पाहणी दौरा करून त्यांच्यावरही कारवाईची तलवार लटकत असल्याचे चित्र आहे. तर कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातही नाल्याच्या सफाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मुदतपूर्व सफाई झालेली नाही. तर नाल्यात कचरा तुडुंब भरल्याची परिस्थिती दिसत आहे.
ठेकेदार काळ्या यादीत : पाहणी दौऱ्यात पालिका आयुक्ताना काम समाधानकारक आढळले नसल्याने मे.जे. एस इन्फ्राटेक ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहे. दुसरीकडे याच कंपनीने कोपरी, आनंदनगर परिसरातील नाल्याची चांगली सफाई करीत रेल्वेचे किंवा नाल्याचे कल्वर्ट तंतोतंत सफाई केलेली आहे. तर ऋतुपार्क येथील नाल्यात मे.जे. एस इन्फ्राटेक ठेकेदाराने अद्यावत पालटून मशीन लावून नालेसफाई शतप्रतिशत करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया ठेकेदाराच्या प्रतिनिधीने व्यक्त केली. त्यामुळे काही ठिकाणच्या दिरंगाई किंवा मुदतपूर्व नालेसफाईच्या कामात अपयश आल्याने काळ्या यादीत टाकणे हे योग्य कि अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. मात्र पालिका आयुक्त बांगर यांनी स्वतः पहाणी केल्यामुळे कारवाई ही योग्य आहे. पण अन्य प्रभाग समितीतील नालेसफाईच्या अपयशाबाबत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाण्यातील नालेसफाई अधुरी : ९ जून पर्यंत अनेक ठिकाणी नाल्याची दुरावस्था असल्याचे चित्र जीपीएस छायाचित्राच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नालेसफाई झाली, मात्र १०० टक्के झालेली नाही. मुदतपूर्व झालेली नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच ठाण्यातील नालेसफाई ही एक अधुरी कहाणी ठरत आहे. त्यातच मुदतपूर्व नालेसफाई न झाल्याने ठेकेदारांना नोटिसा आणि दंडात्मक कारवाईही पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. मात्र कामे पूर्ण न झाल्याने आयुक्तानी मे.जे. एस इन्फ्राटेक ठेकेदार काळ्या यादीत टाकल्याने ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली. अनेक ठेकेदारांशी संपर्क साधला असता अनेक ठिकाणी कचरा काढून टाकण्यासाठी वाट नाही, मनुष्यबळ खोलीच्या नाल्यात उतरण्यास तयार नाही, पोखलेन, जेसीबी, डंपर मिळण्यास उशीर झाल्याने दिरंगाई झाली. अवघ्या ठाण्यात नालेसफाई आणि अडचणींवर मात करण्यासाठी पालटून सारख्या यंत्राचा वापर केला.
वृक्षांच्या छाटणीबाबत आयुक्त समाधानी : पावसाळ्यात वृक्षांमुळे होणाऱ्या अपघातांच्या बाबतीमध्ये महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दौरा करून वृक्ष छाटणी ही चांगली झाली असल्याचे सांगितले, मात्र असे असताना या दौऱ्याला जाताना रस्ते दुरुस्ती आणि रस्त्यांचे बांधकाम अपूर्ण असल्याचे आयुक्तांना दिसले नाही. डेडलाईन वाढवून देऊन देखील मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये रस्त्यांची काम अपूर्णच आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस जर आला, तर ही कामे आणि त्या कामांचा दर्जा दोघांवर मोठा परिणाम होणार आहे.
हेही वाचा :
- अबब....ठाण्यातील ५० टक्के नाल्याची झाली 'सफाई', नालेसफाईच्या दोऱ्यानंतर आयुक्तांच अजब दावा
- Mumbai Nalasafai Online Tracking : मुंबईतील नालेसफाईचे ऑनलाईन ट्रॅकिंग, नागरिकांना घरबसल्या पाहता येणार सद्यस्थिती
- Nalesafai in Mumbai : नालेसफाईकरिता मुंबई महापालिकेची तयारी; गाळ काढण्यासाठी पालिका करणार १५० कोटीचा खर्च