ETV Bharat / state

ठाणे मनपा परिवहन सेवेचे ४३८ कोटी ८६ लाखांचे वास्तववादी बजट सादर, कोणतीही नवी दरवाढ नाही - thane municipal transport system

ठाणे मानपा परिवहन उपक्रमाचे सन २०१९-२० सुधारित व सन २०२०-२१ चे मूळ बजट परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीला सादर केले. परिवहन समिती सदस्यांची रखडलेली नियुक्तीही येत्या काही दिवसात होणार आहे. तूर्त परिवहन समितीचे सभापतिपद रिक्त असल्याने सदस्यांनी निवडलेले प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांना हे बजेट सादर करण्यात आले.

ठाणे मनपा परिवहन सेवेचे बजट सादर
ठाणे मनपा परिवहन सेवेचे बजट सादर
author img

By

Published : Feb 18, 2020, 8:30 PM IST

ठाणे - ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे ४३८ कोटी ८६ लाखांचे वास्तववादी बजट सादर करण्यात आले. यात नव्याने कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. तसेच प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न या बजटच्या माध्यमातून करण्यात आलाचे ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थपाक संदीप माळवी यांनी सांगितले.

ठाणे मनपा परिवहन सेवेचे बजट सादर

ठाणे मनपा परिवहन उपक्रमाचे सन २०१९-२० सुधारित व सन २०२०-२१ चे मूळ बजट परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीला सादर केले. सुधारित बजेट महसुली व भांडवली खर्चासह ३०३ कोटी ५३ लाखाचे असून, सन २०२०-२१ चे मूळ बजट महसुली व भांडवली खर्चासह ४३८ कोटी ८६ लाख रुपयांचे आहे. परिवहन समिती सदस्यांची रखडलेली नियुक्तीही येत्या काही दिवसात होणार आहे. तूर्त परिवहन समितीचे सभापतीपद रिक्त असल्याने सदस्यांनी निवडलेले प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांना हे बजेट सादर करण्यात आले.

सद्यस्थितीत परिवहन सेवेच्या ताफ्यांत असलेल्या एकूण ४६७ बसेस आहेत. त्यापैकी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या २७७ बसेस असून त्यातील सरासरी ११० बसेस रस्त्यावर धावत आहेत. तर, १९० बसेस जीसीसी तत्वावर चालवण्यात येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सीएनजीच्या १०३ बसेस दुरुस्त करुन चालविण्यात येणार आहेत. केवळ माहिलांकरीता शासनाकडून मंजूर झालेल्या झालेल्या ५० तेजस्विनी बसेसपैकी ३० बसेस दैनंदिन वापरात आहेत. उर्वरित २० बसेस मार्च महिन्याअखेर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या शिवाय परिवहन निधीतून ५० नवीन मिडी बसेस खरेदी करण्यांचे नियोजन असून, माहे जून २०२० अखेर पर्यंत परिवहन सेवेच्या त्या बसेस ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - डोंबिवली एमआयडीसी आग: आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

परिवहन सेवेच्या दैनंदिन ताफ्यातील नादुरुस्त बसेस वगळून सरासरी ४०० ते ४५० बसेस रस्त्यावर उपलब्ध करून ठाणेकरांना चांगला प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन सेवेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून दरवर्षी किमान ३५० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी परिवहन सवेकडून केली जाते. मात्र, यंदा त्यात कपात करून २९१ कोटींच्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून त्यातील १३० ते १५० कोटी मिळतील, असा परिवहन प्रशासनाचा अंदाज आहे. वासी बसेस भाड्यापोटी रक्कम १४ कोटी ३६ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरले असून, जेएनएनयूआरम-२ अंतर्गत आलेल्या १९० बसेसपासून ५६कोटी ३४ लाख इतके उत्पन्न अपेक्षित आहे. तर, वोल्वो बसेस पासूनचे उत्पन्न १५ कोटी ८७ लाख अपेक्षित आहे. तसेच, ५० तेजस्विनी बसेसपासून रक्कम ९ कोटी २० लाख, परिवहन सेवेत नव्याने खरेदी करण्यात येणाऱया ५० मिडी बसेसपासून ६ कोटी ९१ लाख व माहे जुलै २०२० मध्ये १०३ सीएनजी बसेस दुरुस्ती करून उपलब्ध होणार आहेत. त्यापोटी २२ कोटी ९३ लाख असे एकूण १२५ कोटी ६० लाख एवढे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

तिकिट विक्री उत्पन्नाव्यतिरिक्त बसेस वरील जाहिरात, विद्यार्थी पासेस, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती पोटी प्रलंबित तसेच इतर किरकोळ उत्पन्न असे एकत्रित २२ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे. असे अंदाजपत्रकातील एकूण महसुली उत्पन्न १४९ कोटी ८१ लाख इतकी उत्पन्नाची जमा रक्कम अपेक्षित धरण्यात आली आहे.

हेही वाचा - लोकलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या 'फटका गँग'चे दोन सदस्य जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.