ETV Bharat / state

महापौर मॅरेथॉन मार्गात खड्डेच खड्डे, हे पाहून महापौरांनी अर्ध्यांतून आटोपला पाहणी दौरा

मानाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असताना, संपूर्ण शहरात तर खड्डे पडलेलेच आहेत यासोबत, मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गातही असंख्य खड्डे असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापौरांनी मॅरेथॉनच्या मार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, रस्त्यावरिल खड्डे पाहून महापौर बाईंनी पालिका मुख्यालय गाठणे पसंत केले.

महापौर मॅरेथॉन मार्गात खड्डेच खड्डे, हे पाहून महापौरांनी अर्ध्यांतून आटोपला पाहणी दौरा
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:10 AM IST

ठाणे - मानाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असताना, संपूर्ण शहरात तर खड्डे पडलेलेच आहेत यासोबत, मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गातही असंख्य खड्डे असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापौरांनी मॅरेथॉनच्या मार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, रस्त्यावरिल खड्डे पाहून महापौर बाईंनी पालिका मुख्यालय गाठणे पसंत केले. त्यानंतर सूत्रानी दिलेल्या माहितीनूसार, महापौरांनी शहरासह मॅरेथॉन मार्गात पडलेल्या खड्ड्यासंदर्भात एक तातडीने बैठक घेतल्याचे समजते.

महापौर मॅरेथॉन मार्गात खड्डेच खड्डे, हे पाहून महापौरांनी अर्ध्यांतून आटोपला पाहणी दौरा

ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली ३० वी 'ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन' यावर्षी १८ ऑगस्टला होणार आहे. यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, उपमहापौर रमाकांत मढवी आणि शहर अभियंते, पालिका अधिकारी यांच्यासह मॅरेथॉन मार्गाचा पाहणी दौरा केला. या दौऱयात त्यांना शहरातील रस्त्याची अवस्थेचा अंदाज आला. हा पाहणी दौरा पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटी, हरि निवास सर्कल त्यानंतर, तीन पेट्रोल असा सुरु होता. तेव्हा आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरचे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे, लोक प्रतिनिधीच्या लक्षात आले.

रस्त्यावरील खड्डे बघून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. अनेक ठिकाणी रस्त्यांची योग्य पद्धतीने कामे झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. रस्त्याची अवस्था पाहून सगळ्यांनी हा दौरा अर्धवट टाकून टेम्बी नाक्यावरुन थेट महापालिका मुख्यालय गाठणे पसंत केले.
पालिका मुख्यालयात आल्यावर स्वतः महापौरांनी एक तातडीची बैठक घेतली असल्याची माहिती सुत्राने दिली. त्यानंतर स्पर्धेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना वेळेत खड्डे बुजवण्याची सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

मागील वर्षी पेक्षा यावर्षी रस्ते बऱ्यापैकी काँक्रीट झाले असून उर्वरित रस्त्यांची कामे सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले. जे रस्ते महापालिकेच्या अंतर्गत येतात ते महापालिका दुरुस्त करणार आहेच. मात्र, इतर प्राधिकरणाच्या अंतर्गत जे रस्ते येतात त्यांना देखील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महापौरांनी सांगितले.

खड्ड्यांवरुन महासभेतही गदारोळ होण्याची शक्यता -
या दौऱ्याला उपस्थित असलेले सभागृह नेते नरेश म्हस्के हे रस्त्यावरील खड्डे पाहून संतप्त झाले. त्यांनी थेट दूरध्वनी वरुनच पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. रस्त्यांची कामे व्यवस्थित झाली नसल्याचे, त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ते या विषयावरुन महासभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Intro:महापौर मॅरेथॉनचा मार्ग खडतर खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे महापौरांना गुंडाळावा लागला दौरा प्रशासनामुळे सत्ताधार्‍यांची अडचणBody:ठा
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपली असताना संपूर्ण शहरभर खड्डे आहेच मात्र मॅरेथानच्या रूटवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अशा खड्डेमय रस्त्यात स्पर्धक कसे धावणार असा प्रश्न आता यानिमित्ताने उभा राहिला आहे . विशेष म्हणजे मॅरेथॉनचा रूट पाहण्यासाठी महापौरांनी केलेल्या पाहणी दौऱ्यातच महापौरांना मॅरेथॉनच्या रूटवर मोठ्या प्रमाणात खड्डे अढळल्याने त्यांनी देखील अर्धवट पाहणी दौरा आटोपून पुन्हा त्या पालिका मुख्यालयात परतल्या. त्यानंतर शहरात आणि मॅरेथानच्या रूटवर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात महापौरांनी एक तातडीची बैठक देखील घेतली असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे .
ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली ३० वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे . यासाठी गुरुवारी महापौर मीनाक्षी शिंदे,सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, उपमहापौर रमाकांत मढवी आणि शहर अभियंत्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते . हा पाहणी दौरा मॅरेथॉनचा रूट पाहण्यासाठी जरी आयोजित करण्यात आला होता मात्र महापौर आणि पालिका अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांची खड्ड्यानी कशा प्रकारे चाळण झाली आहे याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला . हा पाहणी दौरा पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटी ,हरिनिवास सर्कल त्यानंतर , आणि तीन पेट्रोल असा सुरु असताना आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरचे मोठ्या प्रमाणात खड्डडे पडले असल्याचे लोकप्रतिनिधीच्या लक्षात आले . रस्त्यावरील खड्डे बघून सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली . अनेक ठिकाणी रस्त्यांची योग्य पद्धतीने कामे झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले . त्यामुळे हा दौरा अर्धवट टाकून टेम्बी नाक्यावरून लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकारी थेट मुख्यालयात परतले .
पालिका मुख्यालयात आल्यावर स्वतः महापौरांनी एक तातडीची बैठक घेतली असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे . त्यानंतर स्पर्धेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना वेळेत खड्डे बुजवण्याची सूचना दिल्या असल्याची माहिती दिली आहे . गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी रस्ते बऱ्यापैकी काँक्रीट झाले असून उर्वरित रस्त्यांची कामे सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले . जे रस्ते महापालिकेच्या अंतर्गत येतात ते महापालिका दुरुस्त करणार आहेच मात्र इतर प्राधिकरणाच्या अंतर्गत जे रस्ते येतात त्यांना देखील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महापौरांनी सांगितले .

खड्ड्यांवरून महासभेतही गदारोळ होण्याची चिन्हे -
या दौऱ्याला उपस्थित असलेले सभागृह नेते नरेश म्हस्के हे रस्त्यावरील खड्डे पाहून संतप्त झाले . त्यांनी थेट दूरध्वनी वरूनच पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली . रस्त्यांची कामे व्यवस्थित झाली नसल्याचे त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असून आज होणाऱ्या महासभेत या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची चिन्हे आहेत .
Byte मीनाक्षी शिंदे(महापौर ठाणे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.