ETV Bharat / state

Thane Landslide News: दरड कोसळण्याचे सत्र सुरूच; मुंब्य्रात दरड कोसळल्यामुळे ४५ कुटुंबांचे स्थलांतरण - दरड कोसळल्यामुळे ४५ कुटुंबांचे स्थलांतरण

राज्यात सध्या जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. ईर्शाळवाडी दुर्घटना ताजी असताना आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. मुंब्य्रात दरड कोसळल्यामुळे ४५ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

Thane Landslide
ठाणे जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना
author img

By

Published : Jul 28, 2023, 7:10 AM IST

ठाणे जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना

ठाणे : ठाण्यात सुरू असलेल्या मुंब्य्रात दरड कोसळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ४५ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा जोर'धार' बरसल्याने आतापर्यत २२०० मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर रायगड आळीत सोसायटीची भलीमोठी संरक्षक भिंत कोसळली.

डोंगराळ भागात वस्तीनजीक दरड कोसळली : मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीनजीक डोंगराळ भागात वस्तीनजीक दरड कोसळली. यात कुणीही जखमी झाले नसले तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव ४५ कुटुंबाना शेजारील मस्जिद आणि मंदिरामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. ही जागा वन विभागाची असल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह तहसीलदार आणि ठाणे महापालिका प्रशासन आणि टीडीआरएफ व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात होते. ठाण्यात सायंकाळपर्यंत पावसाने शंभरी ओलांडली होती.

साहस दोघांच्या जीवावर बेतले : पावसाळ्यात साहस करणे ठाण्यामध्ये दोघांच्या जीवावर बेतले आहे. मित्रांसोबत बुधवारी सायंकाळी ओवळा पानखंडा येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला कळवा पारसिकनगर येथील चिराग जोशी (१९) याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी बाहेर काढण्यात आला. तर, दुसऱ्या घटनेत कळवा, शांतीनगर येथील ३२ वर्षीय दोहा नामक व्यक्ती रेतीबंदर येथील नाल्यात मासे पकडण्यासाठी गेला असता नाल्यात बुडाला. दरम्यान, सकाळी घोडबंदर रोड, गायमुख येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने दिली.

महामार्गावर पाणी साचल्याने कोंडी : मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाणी साचल्याने घोडबंदर येथील गायमुख ते चिंचोटीपर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गुजरात, वसई येथून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने चिंचोटी मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेला वळल्याने मुंबई नाशिक महामार्गावरही कोंडी झाली. महामार्गावर खड्डे आणि पावसाचे पाणी साचल्याने वाहनांचा मार्ग खडतर बनला आहे. गुरुवारी ठाणे पोलिसांकडून शक्य असल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक करू नये, असे आवाहन केले जात होते.

हेही वाचा :

  1. Landslide in Mumbai : अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटी परिसरामध्ये कोसळली दरड, फ्लॅट्समध्ये साचला मातीचा ढिगारा
  2. Mumbai Pune Highway Closed: मुंबई-पुणे महामार्गावर कोसळली दरड, वाहतूक आज 12 ते 2 वाजेपर्यंत बंद
  3. Chandepatti village: दरड कोसळण्याच्या भीतीने चांदेपट्टी गावातील नागरिकांचे स्थलांतर ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.