ETV Bharat / state

भिवंडी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील ५ गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

गुन्हेगारांकडून १२ दुचाक्या, घरफोडी गुन्ह्यातील दागिने, मोबाईल आणि अमली पदार्थ, तलवारींसह एक गावठी कट्टा आणि काडतुसे असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

author img

By

Published : Dec 24, 2020, 5:14 PM IST

ठाणे
ठाणे

ठाणे - अनलॉक काळात भिवंडी शहरात गुन्हेगारांनी धुडगूस घातल्याचे विविध पोलीस ठाण्यांच्या नोंदीवरून दिसून आले आहे. अशा गुन्हेगारी कारवाईंच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल, चैन स्नेचिंग, घरफोडी, दुचाक्या आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ५ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. अली अकबर उर्फ जागू निसार हुसेन इराणी जाफरी (वय २१ रा. पिराणीपाडा, भिवंडी) अतिक अहमद जुबेर अहमद अन्सारी (वय २२ रा. रेहमतपुरा, भिवंडी) मोहमद नदीम सौजुद्यीन कुरेशी (वय २० रा. गायत्रीनगर भिवंडी) कमाल अहमद निहाल अहमद अन्सारी (वय ३४ रा. न्यु आझाद नगर भिवंडी) मोहमंद अफजल मोहमद आयुब वारसी (वय २४, रा. चौधरी कम्पाउंड शांतीनगर भिवंडी) असे मुसक्या आवळलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्हेगारांनाकडून १२ दुचाक्या, घरफोडी गुन्ह्यातील दागिने, मोबाईल आणि अमली पदार्थ, तलवारीसह एक गावठी कट्टा आणि काडतुसे असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भिवंडी
अनलॉक काळात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

परिमंडळ-२ च्या हद्दीत टाळेबंदीच्या काळात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपापल्या पोलीस ठाण्यात हद्दीत सतर्क गस्त करून, असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पूर्व विभागांचे सहा. पोलीस आयुक्त प्रशात ढोले, पश्चिम विभागाचे सहा. पोलीस आयुक्त किसन गावित, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राउत यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून जबरी चोरी, सोनसाखळी, मोटारसायकल चोरी, घरफोडी, गांजा तस्करी करणारे असे ५ गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक केली आहे.

विविध गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश

जबरी चोरीची तयारी १ गुन्हा, जबरी चोरी १ मोटार सायकल चोरीचे १२ गुन्हे, तसेच भिवंडी शहरामधून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गांजा (अमली पदार्थ) विक्री करणारा एक गुन्हेगार तलवारीसह अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी शांतीनगर पोलीस ठाण्याचे १ जबरी चोरीची तयारी, १ जबरी चोरी, ६ मोटार सायकल चोरीचे.१ घरफोडी, गांजांची तस्करी करणारे विरोधात १ गुन्हा असे १० गुन्हे, त्याव्यतिरिक्त भिवंडी शहर पोलीस ठाणे कडील ३, कोळशेवाडी,बाजारपेठ व पायधुनी पोलीस ठाणे कडील प्रत्येकी १ असे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.या गुन्हेगारांकडून जबरी चोरीच्या प्रयत्नात वापरण्यात आलेले १६,हजार रुपयाचा एक गावठी कट्टा , दोन जिवत काडतुस, जबरी चोरी केलेला १२, हजार ९९० रुपयांचा मोबाईल, घरफोडी मधीला १५ ग्रॅम वजनाची ३० हजार किंमतीची सोन्याची चैन, आणखी एका गुन्हेगारकडून १२ मोटारसायकल, १ किलो ७३० ग्रॅम वजनाचा गांजा व एक लोखंडी तलवार आशा प्रकारे ६ लाखांचा मुद्येमाल पाचही आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.