ETV Bharat / state

Thane Crime: पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांना चुना; आरोपींचा शोध सुरू - ठाणे गुन्हे पेमेंट कंपनी फ्रॉड

Thane Crime हॅकिंगमुळे आता पेमेंट गेटवे सेवा पुरवठादार कंपन्यांचे खातेदेखील सुरक्षित राहिले नसल्याचे समोर आले. एका पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मात्र त्यापैकी अद्याप कुणालाही अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश आले नाही.

payment gateway company   hacking thane
payment gateway company hacking thane
author img

By PTI

Published : Oct 9, 2023, 7:22 AM IST

Updated : Oct 9, 2023, 8:52 PM IST

ठाणे Thane Crime - आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमधून 16,180 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून पेमेंट गेटवे कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका पेमेंट गेटवे सेवा पुरवठादार कंपनीला बसला आहे.

खाते हॅक करून 25 कोटी रुपये लुटले - नौपाडा पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पेमेंट गेटवे कंपनीची फसवणूक अनेक दिवसांपासून सुरू होती. एप्रिल 2023 मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून 25 कोटी रुपये लुटल्याची ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्याचा तपास सुरू असताना या मोठ्या लुटीची घटना समोर आल्याचं नौपाडा पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांनी तपास केला असता, 16,180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक उघडकीस आल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. त्याचा एफआयआरमध्ये उल्लेख असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

सायबर एक्सपर्ट यांच्या मदतीनं तपास सुरू- ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी शुक्रवारी संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदार, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. खोट्या कराराचा वापर करत भागीदारीमध्ये कंपनी तयार करून 260 पेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट तयार करून हे पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. या एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार आल्याच समोर आल्यावर आता पोलीस सायबर एक्सपर्ट यांच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास करत आहेत

असा गुन्ह्याचा उलगडा झाला- 25 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा खानापूर श्रीनगर पोलीस ठाण्यात 16 जून रोजी दाखल करण्यात आलेला होता. याचा तपास करताना सायबर सेलने गुजरातमधून दोघांना अटक केलं होतं. या प्रकाराच्या तपासात एक कोटी 39 लाख रुपयांचा एक व्यवहार पोलिसांना समजला. मग पोलिसांनी अधिक तपास करून या गुन्ह्याची उकल केली. याचा तपास करत असताना पोलिसांनी बेलापूरमधल्या एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तपास केला असता अनेक खोटे कागदपत्र मिळाली आहेत. या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी बनावट कागदपत्र वापरून त्याचा खोटा वापर करत करारनामे तयार केल्याचेदेखील पोलिसांना समोर आढळून आले. दोन आरोपी हे बँकिंग क्षेत्रातील आहेत. त्यांना रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर या कामांचा अनुभव देखील आहे. याच अनुभवाचा फायदा घेत त्यांनी हा घोटाळा केला आहे.

हा गुन्हा मागील अनेक महिन्यांपासून पाच आरोपी करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून आम्ही कागदपत्र पुरावे गोळा करण्याचे काम करत आहोत. सायबर पोलिसांच्या मदतीने आणखीन अनेक आरोपी शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत -नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ

हजारो बँक खात्यांना लक्ष्य- पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपी जितेंद्र पांडे याने यापूर्वी विविध बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून 8 ते 10 वर्षे काम केले होते. मात्र, 16 हजार कोटींच्या मोठ्या लुटीमध्ये अनेक आरोपी असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे. या गुन्ह्यात आरोपींनी हजारो बँक खात्यांना लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. पोलीस तपास पथकाने आरोपींकडून अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली असून त्यामधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

२६० झोपडपट्टी धारकांचा आणि बँक खात्याचा वापर : रिह्याला इंटरप्राइझेस कंपनीच्या कामगारांकडे तपास केल्यानंतर त्यांच्याकडून २६० बँक खात्यांची माहिती समोर आली. कर्जाची गरज असलेल्या लोकांना लोनच्या बहाण्याने झोपडपट्टी धारकांची बँक खाती आणि केवायसी यांच्या आधारे आरोपींची स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली. ज्यांच्या बँक खात्यात आर्थिक देवाण-घेवाण झाली. या बँक खत्यांची बँक स्टेटमेंट प्राप्त केली असता त्या मध्ये अंदाजे 16 हजार 180 कोटी 92 हजार चारशे रूपये एवढ्या रकमेची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले.

ठाण्यातील बाल गणेश टॉवरमध्ये स्कॅमचे मुख्यालय : बँक खातेदारांची आणि सायबर पोलिसांची झोप उडविणाऱ्या १६ हजार कोटीच्या स्कॅमचे मुख्यालय ठाण्याच्या बाळ गणेश टॉवर स्टेशन रोडवर असलेल्या तिसऱ्या माळ्यावर ३०९ नंबरच्या ऑफिसमध्ये बनावट भागीदाराची कंपन्या थाटून व्यवहार सुरु होता. मात्र पोलिसांना याबाबत सुगावा लागताच आरोपींची पोबारा केला. दरम्यान पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रानंद्वारे 5 भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले, सदर स्कॅमचा तपास हा सायबर पोलीस अधिकारी सतिशचंद्र राठोड हे करीत आहेत.

हजारो कोटी आले कुठून अन परदेशात गेले कसे ? : ठाणे पोलीस मुख्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक मोठा स्कॅम असलयाचे चित्र आहे. १६ हजार कोटीची एवढी मोठी रक्कम आली कुठून आणि परदेशात रक्कम गेली कशी याबाबत ठाणे पोलिसांनाही माहिती नाही. तर आरोपींची ठाणे पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत ठाणेकरांना त्यांच्या दस्तावेजचं वापर करून चुना लावला हे माहितही पडले नाही. तब्बल १६ हजार कोटीच्या रक्कमेचा व्यवहार आणि देवाणघेवाण होते. ठाण्यात नवीमुंबईत कार्यालये थाटली जातात. लोनसाठी कागदपत्र स्वीकारून त्याचा वापर करून रक्कमेची देवाणघेवाण झाली परंतु कुणालाही कानोकानी खबर नाही. मोठी रक्कम गेली परदेशात यामुळे सायबर विभागही संभ्रमात आहे.

हेही वाचा-

  1. Guwahati Crime News : धक्कादायक! मित्राची हत्या करून मृतदेह रस्त्यात फेकून दिला
  2. Financial Fraud Amravati: पोलीस ठाण्यात तक्रार देते म्हणून महिलेने उकळले १४ लाख रुपये

माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाब राव उगले

Last Updated : Oct 9, 2023, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.