ETV Bharat / state

Thane Crime News : बारगर्ल सप्लायरचे गुंडांच्या टोळीकडून अपहरण; कारण ऐकून पोलीसही चक्रावले - उल्हासनगर येथील पॅराडाईज हॉटेल

Thane Crime News : उल्हासनगर येथील कथित बारगर्ल सप्लाय करणाऱ्या तरुणाचे प्रोटेक्शन मनीसाठी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. कथित बारगर्ल सप्लायर तरुण हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो एका मित्रांसोबत पाटर्नरशिपमध्ये बारगर्ल सप्लायरचा व्यवसाय करतो. दरम्यान, या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

Thane Crime News
बारगर्ल सप्लायरचे गुंडांच्या टोळीकडून अपहरण; कारण ऐकून पोलिसही चक्रावले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 9:33 AM IST

Updated : Oct 17, 2023, 11:47 AM IST

बारगर्ल सप्लायरचे गुंडांच्या टोळीकडून अपहरण; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

ठाणे Thane Crime News : उल्हासनगर शहरातील विविध डान्सबारमध्ये बारगर्ल सप्लाय करणाऱ्या तरुणाचं प्रोटेक्शन मनीसाठी अपहरण केल्याचं समोर आल्यानं पोलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे कथित बारगर्ल सप्लायर तरुण हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो एका मित्रासोबत पाटर्नरशिपमध्ये बारगर्ल सप्लायरचा व्यवसाय करतो. याची माहिती गुंडांच्या टोळीतील म्होरक्याला मिळताच त्यानं तीन साथीदाराच्या मदतीनं त्याचं अपहरण करून जंगलात नेऊन बेदम मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी एका गुंडाला अटकही केली आहे.

धमकी देत केली पैशांची मागणी : अजय बागुल असं अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव असून टोळीचा म्होरक्या देवा खेडेकरसह कुणाल वशिटा, साहिल बेद, हे तिघं फरार असून पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार दुर्गेश कैलास वारे हा उल्हासनगरच्या म्हारळ गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील कैलास वारे हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत. दुर्गेश हा डान्सबारमध्ये बारबालांचा पुरवठा त्याचा मित्र उत्तम याच्यासोबत पाटर्नरशिपमध्ये करतोय. तर टोळीचा म्होरक्या देवा हा विठ्ठलवाडी भागात राहत असून तो दुहेरी हत्याकांडाची शिक्षा भोगून काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आलाय. देवा हा राहत असलेल्या भागात दहशत पसरवून हॉटेल मालक, व्यापारी अन्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रोटेक्शन मनीसाठी धमकी देत असतानाच 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा तक्रारदार दुर्गेश हा उल्हासनगर येथील पॅराडाईज हॉटेलच्या बाहेर उभा होता. त्यादरम्यान देवा आला आणि दुर्गेशला जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या टोळीसह शहाड स्थानकाच्या दिशेनं गेला. त्यानंतर दुर्गेशला दुसऱ्या वाहनातून कांबा गावानजीक जंगलात नेऊन देवा खेडकरनं त्याच्या अन्य तीन मित्रांसह दुर्गेशला रात्री तीन वाजेपर्यंत हॉकी स्टिकनं बेदम मारहाण केली. तसंच एक लाख रुपयांची मागणी करून तुला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुला मारून टाकू, अशी धमकी दिली.

कार फोडून बनवला व्हिडिओ : गुंडांच्या धमकीला घाबरून दुर्गेश म्हणाला की, माझ्याकडं इतके पैसे नाहीत, मी आता फक्त 30 हजार रुपये देऊ शकतो, तो असं म्हणाल्यावर गुंडांनी त्याला उल्हासनगर येथील एका बारजवळ आणलं. त्यानंतर दुर्गेशनं 30 हजार रुपये दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याली सोडून दिलं. आणि पोलिसांना काहीही न सांगण्याची धमकी दिली. तसंच दुर्गेशची कार फोडून त्याचा व्हिडिओ बनवला.

चौघांपैकी एकाला चार दिवसांची पोलीस कोठडी : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर दुर्गेशनं तक्रार देण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून देवा खेडकर, कुणाल वशिटा, साहिल बेद, अजय बागुल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 13 ऑक्टोबर रोजी या चौघांपैकी अजय बागुल याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. तसंच उर्वरित अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Death Threat to Builder : बिश्नोई गँगचं नाव सांगून बिल्डरला जीवे मारण्याची धमकी, दोघांना अटक
  2. Thane Crime: चार्जरच्या वायरने झोपलेल्या मित्राचा गळा आवळून खून, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
  3. Jameel Sheikh Murder: राबोडी जमील शेख हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Last Updated : Oct 17, 2023, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.