ठाणे - आई व लहान भावाला सतत मद्यपान करून घरात मारहाण करणाऱ्या बापाची पोटच्या मोठ्या मुलाचेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घरातील लोखंडी खलबत्याचे मुसळ व हातातील कड्याने डोक्यात मारून बापाची हत्या केली. ही घटना भिवंडी शहरातील भाग्यनगर-कमतघर परिसरात असलेल्या कॉम्युटर सेंटरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आशिष चौधरी (वय २०) असे अटक मुलाचे नाव आहे. तर, विजय चौधरी (वय ५६) असे हत्या झालेल्या बापाचे नाव ( boy killed father in bhiwandi ) आहे.
भिवंडी शहरातील भाग्यनगर - कामतघर परिसरात मृत विजय हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्याचे घरातच कॉम्युटर सेंटर आहे. मृत बापाला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे मृत विजय हे वारंवार पत्नी व मुलांना किरकोळ कारणावरून वाद घालून मारहाण करत होते. असाच प्रकार ( ४ ऑगस्ट ) रोजी रात्रीच्या सुमारास घडला. त्यावेळी बाप दारूच्या नशेत घरी आला. त्यानंतर पत्नीशी वाद घालून मारहाण करत होते. तर, लहान मुलाने बापाला आईला का मारतात अशी विचारला केली असता, बापाने लहान मुलाला मारहाण सुरू केली. त्यानंतर लहान भावाने मारहाण केल्याच्या घटनेची माहिती मोठा भाऊ असलेल्या आशिषला देताच, घरी येऊन रागाच्या भरात आशिष आणि मृत बापाशी जोरदार वाद घातला. या वादातून आशिषने बापाच्या डोक्यात खलबत्याच्या लोखंडी मुसळ व हातातील कड्याने प्रहार केले. या घटनेनंतर गंभीर अवस्थेत बापाला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराच्या काही वेळानंतर बापाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आशिषवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शनिवारी ( 6 जुलै ) दुपारच्या सुमारास आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे करीत आहेत.