ठाणे : ठाणे जिल्ह्यात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे 2 वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अत्याचारसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी पीडितेच्या शेजारी राहतो : घटनेतील 2 वर्षीय पीडित चिमुरडी कल्याण पश्चिम भागातील एका इमारतीत कुटुंबासह राहते. तर 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा पीडितेच्या शेजारी राहतो. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित चिमुरडीच्या आईने या मुलाला परिसरात असलेल्या किराणा दुकानात साखर आणण्यासाठी पाठवले होते. या मुलाने दुकानातून साखर आणून साखरेचे पाकीट मुलीच्या आईला दिले. त्या वेळी त्याने ती मुलगी एकटीच खेळत असल्याचे पाहिले. दरम्यान, पीडित चिमुरडीची आई किचनमध्ये गेली असता घराचा दरवाजा उघडा होता. हा मुलगा त्या मुलीसोबत खेळत होता. त्यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या मुलाने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.
चिमुरडीसोबत वारंवार असे कृत्य झाले आहे : या प्रसंगाने ही चिमुरडी घाबरली आणि तिने जोरात आरडाओरडा सुरू केला. यानंतर तो मुलगा तेथून निघून गेला. दरम्यान चिमुरडी रडत असल्याचे पाहून काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच पीडितेच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या अल्पवीयन मुलाने चिमुरडीसोबत असे कृत्य वारंवार केल्याचे कुटुंबीयांना समजताच, पीडितेच्या आईने 4 ऑगस्ट रोजी मुलाविरोधात तक्रार दिली.
अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले : या प्रकरणी अल्पवयीन मुलावर भादंवि कलम 376 (3), 376 (अ), (ब) आणि पोक्सो कलम 4, 6, 8, 10, 12 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी भिंवडीच्या बाल सुधारणा गृहात करण्यात आली आहे.
हेही वाचा :