ETV Bharat / state

बोगस कॉलद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक ; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - फेक कॉल

लोकांशी मोबाईल किंवा टेलिफोनवर संपर्क साधून शून्य टक्क्याचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून 'ते' पाचही जण ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यानंतर त्याच्याकडून प्रोसेसिंग फी, जीएसटी फी, आणि अन्य अशी कारणे सांगत ऑनलाईन पद्धतीने किंवा बँक खात्याद्वारे पैसे स्विकारत होते.

thane crime branch arrested five people in case of cheating
बोगस कॉलद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक
author img

By

Published : Mar 13, 2020, 9:02 AM IST

ठाणे - कंपनीकडून शून्य टक्क्याने कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलीसांनी अटक केले आहे. बोगस कॉलसेंटरच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करून, त्यांना विविध कारणे सांगत ऑनलाईन पैसे स्विकारणाऱ्या 'केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. कंपनी'च्या पाचजणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोगस कॉलद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक ; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

हेही वाचा... पंजाब बँक घोटाळा - माजी संचालकांसह २ व्हॅल्युअरला मुंबई पोलिसांकडून अटक

गणेश तिरुपल्ली, गणेश मांजरेकर , ज्ञानेश्वर कांबळे, धीरज सिंग आणि तुषार सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. आणि स्टेज डोअर कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीत संयुक्तरित्या काम करत होते. वागळे इस्टेट (रोड नं २२ प्लॉट क्र. ए/३२१) येथे डिसेंबर २०१९ पूर्वीपासून केटर ऑनलाईन रिटेल प्रा. लि. व स्टेज डोअर कम्युनिकेशन प्रा. लि. हे बोगस कॉलसेंटर चालवून या पाचही जणांनी महाराष्ट्र आणि देशभरातील लोकांना गंडा घातला आहे.

लोकांशी मोबाईल किंवा टेलिफोनवर संपर्क साधून शून्य टक्क्याचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून ते ग्राहकाला आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यानंतर त्याच्याकडून प्रोसेसिंग फी, जीएसटी फी, आणि अन्य अशी कारणे सांगत ऑनलाईन पद्धतीने किंवा बँक खात्याद्वारे पैसे स्विकारत होते.

हेही वाचा... रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या विरोधात सासूची पोलिसांत तक्रार

कॉलद्वारे फसवणूक होत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाला मिळाली होती. त्यांनी फसवले गेलेल्या ग्राहकांचे नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी फसवणूक झाल्याचे आणि विविध कारणे सांगितली. पोलीस चौकशीत काही बँक खाती हि स्टेज डोअर कंपनी प्रा. लि., स्टर्लिंग ट्रॅव्हलर्स लि., कोलकात्ता स्थित इतर कंपन्यांच्या नावे आरोपींनी ग्राहकांचे पैसे स्वीकारून त्यांना गंडा घातला होता.

या प्रकरणी तक्रारदारांच्या मदतीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत पाचही जणांना बेड्या ठोकल्या. बजाज कंपनीच्या नावे अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रारदाराने ठाणे शहर कोर्टनाका ठाणे येथे किंवा ०२२-२५३४३५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.