ETV Bharat / state

Thane crime : चिमुरडीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला बिहारमधून अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 9:13 PM IST

भिवंडी शहरात एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या नराधमाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस पथकानं बिहार राज्यातून आरोपाला अटक केली आहे.

Thane crime
Thane crime

ठाणे : भिवंडीत चिमुरडीचा खून करून धक्कादायक घटना परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर उघडकीस आली होती. याप्रकरणी सुरवातीला भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. चिमुरडीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याने निष्पन्न झाले. पोलिसांनी नराधामा विरोधात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या चिमुरडीचे आई-वडील हे दोघेही भिवंडीतील एका गोदामामध्ये काम करण्यासाठी जात आहेत. नेहमीप्रमाणे 13 सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. हत्या झालेल्या सहा वर्षीय मुलीसोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता. त्यावेळी चिमुरडी सकाळपासूनच बेपत्ता होती. सायंकाळी आई- वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली होती.

बकेटमध्ये आढळला होता मुलीचा मृतदेह- पोलिसांनी 14 सप्टेंबरला नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्येसुद्धा सर्च ऑपरेशन घेतले होते. परंतु त्याठिकाणी चिमुरडी आढळून आली नव्हती. मात्र शुक्रवारी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका कुलूप बंद घर असलेल्या चाळीतील खोलीमध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते.

बिहारला पोलीस पथक रवाना झाले होते- पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात रवाना केला. घटनास्थळी ठाणे येथील ठसे तज्ज्ञ पथकसुध्दा दाखल झाले असून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढवली जाईल, असे सांगत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली असल्याची माहिती घटनास्थळी भेट देणारे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी घटना उघडकीस आल्याच्या दिवशी दिली होती.

खोलीत ३५ वर्षीय आरोपी एकटाच राहत होता- चिमुरडीचा मृतदेह चाळीच्या खोलीत आढळून आला होता. त्या चाळीत कोणीही रहिवाशी राहत नव्हते. केवळ त्यामधील एका खोलीत ३५ वर्षीय नराधम एकटाच राहत होता, अशी माहिती त्या खोली समोरच्या चाळीत राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना दिली होती. विशेष म्हणजे हा नराधम घटना घडल्याच्या दिवसापासून बेपत्ता झाला होता. शिवाय गेल्या दीड महिन्यापूर्वीच या खोलीत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी नराधमाची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी बिहार राज्यात पोलीस पथक गेल्याची माहिती तपास अधिकारी चेतन काकडे यांनी दिली होती.

हेही वाचा-

  1. PCMC Crime News: 'म्हणून...' मित्रांनीच केला मित्राचा घात, सहा महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला हत्येचा गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.