ठाणे : गेल्या 24 तासात बदलापुरात 26 तर अंबरनाथ शहरात 82 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती दोन्ही नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बदलापूर शहरातील रुग्णांच्या संख्येत आज धक्कादायक वाढ झालेली दिसून आली. आज 26 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने शहरातील रुग्णसंख्या 380च्या घरात पोहचली आहे. आज एकूण 37 जणांचे कोरोना अहवाल पालिकेत प्राप्त झाले. त्यापैकी 11 अहवाल निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज पॉझिटिव आलेल्या 26 व्यक्तींमध्ये 18 व्यक्ती हे विविध बाधित व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तर अन्य रुग्णांमध्ये नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर, 2 बीएमसी कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय परिचारिका, सुरक्षा रक्षक, खासगी कंपनी कर्मचारी, आरपीएफ आणि पोलीस यांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील 197 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 174 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. तसेच, आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
अंबरनाथ शहरातील कोरोना रुग्णसंख्या 541 वर पोहचली असून आज 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज नगरपालिकेत 118 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल 82 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील 185 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. तर 338 रुग्ण उपचार घेत आहेत. अंबरनाथ शहरात आजपर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
हेही वाचा : जिल्ह्यात आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 162 वर