ठाणे Boyfriend Try To Kill Girlfriend : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मुलावर दाखल गुन्हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. आता या प्रकरणात पोलीस आरोपीला कशा पद्धतीनं मदत करत आहेत, ही बाब पीडितेनं सांगितली.
पोलीस दबावाखाली काम करत आहेत : "माझ्यासोबत झालेल्या प्रकाराबाबत ठाणे पोलीस सुरवातीपासूनच कोणाच्या तरी दबावाखाली काम करत होते. त्यामुळे माझा जवाब पुन्हा घ्यावा अशी विनंती करूनही तो घेतला गेला नाही. यावरून ठाणे पोलीस आरोपीला मदत करत असल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. विशेष चौकशी पथक आजपर्यंत माझ्याकडे आलेलं नाही किंवा माझ्याकडून कोणतीही माहिती घेतली गेली नाही", असं पीडिता म्हणाली.
न्यायालयात जाऊन दाद मागणार : "मला आता पोलिसांच्या कामावर विश्वास राहिलेला नाही. लग्नाचं आमिष दाखवून माझा वापर झाला. त्यानंतर मला मारण्याचा प्रयत्न झाला. एवढं झाल्यानंतरही काही दिवसांनी मला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता मला न्यायालयात जावं लागणार आहे. मी तेथे जाऊन न्याय मिळवणार आहे", असा इशारा या प्रकरणातील पीडितेनं दिला.
महिला आयोगाची ठाणे पोलिसांना नोटीस : पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या हलगर्जीपणा नंतर महिला आयोगानं ठाणे पोलिसांना नोटीस पाठवली होती. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना देखील उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. हे प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. मात्र या चौकशीचं पुढे काय झालं, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. विशेष तपास पथकाला या प्रकरणाचा आणखी तपास करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही रिपोर्ट आला नाही. यासाठी आणखी किती वेळ लागू शकतो? या प्रश्नावर पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव यांनी काहीही सांगता येणार नाही, असं उत्तर दिलं.
हे वाचलंत का :