ठाणे - ठाण्यात लाखो रुपयांचे गोमांस पकडण्यात आले आहे. 15 दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जनावरांची कत्तल करून बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली होती. तर आज रॉबडी पोलिसांनी सापळा रचून दोन ट्रकमधून पाच टन आठशे किलो गोमांस जप्त केले आहे. या गोमासांची किंमत अदाजे 16 लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या ट्रकचा चालक हा फरार झाला आहे.
16 लाखांचे गोमांस जप्त
राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या पथकाला या घटनेबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राबोडी फायर ऑफिस परिसरात सापळा रचला, दरम्यान त्यांना दोन संशयास्पद ट्रक समोरून येताना दिसले, पोलिसांनी ट्रक अडवताच एका ट्रकमधून उडी मारून चालक फरार झाला, तर दुसऱ्या ट्रकच्या चालकाला पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी दोन ट्रकमधून पाच टन ८०० किलो गोमांस जप्त केले असून, त्याची अदांजे किंमत 16 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी सापळा लावल्याचे लक्षात येताच, त्यातील एका ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या गडबडीत त्याच्या ट्रकचा अपघात झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन