ठाणे - बँकेत तुमची रक्कम सुरक्षित असते असं नेहमीच म्हटलं जाते. मात्र, अंबरनाथ मधील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे मोबाईल नंबर लिंक नसलेल्या खातेदाराच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बँक कर्मचारी सुमित मंगलानीसह खातेदार विजय गुप्ताला पोलिसांनी अटक केली आहे.
बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला
अंबरनाथ पश्चिमेला बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेत क्लार्क म्हणून आरोपी सुमित मंगलानी काम करतो. या आरोपीने आपल्या बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या सर्व खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर वळती करत खातेदारांची फसवणूक केली आहे. बँकेतील जे खाते मोबाईल नंबरसोबत लिंक नव्हते, त्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली आहे. खातेदार आणि बँकेच्या लक्षात ही बाब आल्यावर बँकेच्या मॅनेजरने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार केली.
हेही वाचा-ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने सज्ज रहावे - एकनाथ शिंदे