ETV Bharat / state

Thane Accident News: मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची प्रवासी जीपला जोरदार धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. प्रवासी जीपला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहाजण जखमी झाले आहेत.

Thane Accident News
ठाण्यात भीषण अपघात
author img

By

Published : Jul 18, 2023, 10:58 AM IST

Updated : Jul 18, 2023, 1:11 PM IST

ठाणे जिल्ह्यात भीषण अपघात

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावात कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत जीपमधील सहा प्रवाशांचा मृत्यू, तर सुमारे पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. काळ्या पिवळ्या प्रवासी जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रवासी जीप साठ फूट दूर फेकली गेली होती. घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करुन चारही मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत. जखमींनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद : या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघात प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त प्रवासी जीप ही पडघा गावातून प्रवासी घेऊन मुंबई नाशिक महामार्गावरून खडवली रेल्वे स्थानकाकडे आज सकाळच्या सुमारास जात होती. याच दरम्यान महामार्गावरील खडवली फाट्यावर ही जिप खडवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर क्रॉसिंग करत होती. तेव्हा नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने प्रवासी जीपला जोरदार धडक दिली.

मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता : या भीषण अपघातात प्रवासी जीपचा चेंदामेंदा होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जखमी झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पडघा पोलीस ठाण्याचे पथकाने दाखल होऊन पंचनामा केला. चारही मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले, या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघात प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रवासी जीपचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पडघा पोलिसांनी दिली आहे. मृतक आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. Canada Accident: कॅनडामध्ये जेष्ठ नागरिकांना घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 15 ठार, 10 जखमी
  2. Bus Accident In Nashik : सप्तश्रृंगी घाटात एसटी बस 400 फूट खोल दरीत कोसळून अपघात; 1 महिला ठार, तर 18 प्रवासी जखमी
  3. Bus Accident On Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, बस ट्रकच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी

Last Updated : Jul 18, 2023, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.