ठाणे : ठाकरे शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या डझनभर नगरसेवकासह कार्यकर्त्यानी अखेर ताब्यात ( Shinde group take over Thackeray group branch ) घेतली. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये या शाखेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी ही शाखा शिंदे गटाने कायदेशीर ताब्यात घेतली असल्याचे प्रसारमाध्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे. मात्र शाखेवर कब्जा घेताना मोठ्या प्रमाणात पोलसांचा बंदोबस्त ( Shinde group take over branch In Police Presence ) होता.
शाखेचे सामंजस्याने दोन भाग :बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटांमध्ये डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची? यावरून दोन महिन्यांपूर्वी मोठया प्रमाणात वादावादी होऊन राडे झाले. त्यानंतर या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी दोन्ही गटातील हा वाद पुन्हा उफाळला आला. आणि ही शाखा आमचीच आहे, असा दावा शिंदे गटातील बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
शाखेच्या जागेची विक्री कराण्याचे काम होते सुरू : विशेष म्हणजे कोरोनाच्या आधीपासूनच या शाखेच्या जागेची विक्री कराण्याचे काम सुरू ( Planning of Sale branch premises ) होते. हे काम पूर्ण झाले असून बाळासाहेबांच्या शिवसेनेने ही शाखा अखेर ताब्यात घेतली आहे. असे शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटातील नगरसेवक महेश पाटील, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे यांच्यासह डझनभर नगरसेवक शाखेत येऊन बसले होते.