ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी कांयदे यांच्याकडून व्यक्त केली.
पहिल्यांदा सचिव पदाची जबाबदारी : पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण येत होती. खरे तर बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहे, असे कायंदे म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सचिव पदाची जबाबदारी मनिषा कायंदे यांना देण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली. तसेच मुंबई महानगर पालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांचा पत्नी सानवी तांडेल यांनी देखिल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा सचिव पदाची कायंदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
खऱ्या अर्थाने आमचे सरकार काम करत आहे. आमचा फोकस वैयक्तिक लाभापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळेल, यावर आहे. - एकनाथ शिंदे
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दिवस : या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्याचा वर्धापन दिन बाळासाहेबांच्या विचारांचा वर्धापन दिन आहे. वाघाने डरकाळी फोडल्यावर काय होते, मोदी साहेबांचे काम आहे नुसते आरोप करणाऱ्यांचे लोकांचा काय होईल, हे दिसेल. बाळासाहेब यांचे स्वप्न करणाऱ्या लोकांसोबत बरोबर युती केली आहे. तुम्ही सत्तेसाठी गेला आहात. गरज सरो वैद्य मरो, असे शब्द आहेत. उद्या बोलले तीच कॅसेट आहे. नवीन काही नाही. आम्ही सरकार पुढे नेत आहोत.
हेही वाचा :