ठाणे : शहापूर तालुक्यातील अजनुप विभागात बिबट्या दिसल्याने या भागातील वीटभट्टी मजुरांमध्ये दशहतीची वातावरण पसरले आहे. या बिबट्याने आतापर्यत कोणावर हल्ला केला नसल्याचे जरी सांगण्यात आले असले, तरी काही झोपडीबाहेरील कोंबड्या पळवून फस्त केल्याचे समोर आले आहे.
वीटभट्टी मजुरांना दिसला बिबट्या
शहापूर तालुक्यातील अजनुप विभागात बिबट्याचा वावर गेल्या चार पाच दिवसांपासून दिसून असल्याचे या भागातील वीटभट्टीवर आलेल्या मजुरांनी सांगितले. रात्रीच्या वेळी वीटभट्टी लगत असलेल्या नदीजवळ बिबट्या दिसून आला. शिवाय रात्री दोन ते तीनच्या सुमारास आचानक जोरजोरात बिबट्याचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा वीटभट्टी काम करणारे काही मजुरांनी झोपडीतून बघीतले तर बिबट्या निदर्शनास आला. यामुळे या वीटभट्टी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांवर हल्ला करण्यापूर्वीच या बिबट्याला लवकरात लवकर वन विभागाने जाळ्यात पकडून पुढील अनर्थ टाळावा अशी मागणीही या परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
दीड वर्षांपूर्वीही लगतच्या तालुक्यात बिबट्याचा हल्ला
शहापूर तालुक्याला लागूनच असलेल्या मुरबाड तालुकात दीड वर्षांपूर्वीही एका ६० वर्षीय आजीने बिबट्याशी झुंज देऊन आपल्या दोन नातवांचे प्राण वाचवल्याची घटना घडली होती. या आजीने दाखवलेल्या धाडसाचे त्यावेळी कौतुक झाले होते. नरेश भाला (७) आणि त्याचा चुलत भाऊ हरेश (१३) हे दोघे भाऊ त्यांच्या आजीने बिबट्याशी झुंज देत आपल्या दोन नातवांचे प्राण वाचवले होते. टोकावडे परिसरातील करपट वाडी वाडीत राहणारे हरेश भाला आणि त्याचा भाऊ नरेश हे आपल्या आजी सोबत त्यावेळी शेतावर गेले होते.