ETV Bharat / state

धक्कदायक! घर बळकवण्यासाठी मालकाची गळा चिरून निर्घृण हत्या - भिवंडी घरमालकाची हत्या

तुळशीराम चव्हाण भिवंडीतील नालापार भागातील बंजारा पाडा येथील घरातून शनिवारी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या समोरून पायी जात असताना हल्लेखारांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Tenant killed homeowner in Bhiwandi
घरमालकाची हत्या करणाऱ्या भाडेकरूला साथीदारासह अटक
author img

By

Published : Mar 9, 2020, 7:57 AM IST

ठाणे - घरातून बाहेर काढल्याचा राग मनात धरुन भाडेकरूने मालकाची हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली. बळकवण्यासाठी भाडेकरूने २ साथीदाराशी संगमत करून घर मालकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली आहे. भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यासमोर ही घटना घडली.

हेही वाचा... तेलंगणा ऑनर किलींग प्रकरण : जावयाच्या खुनाचा आरोप असणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या..

भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर भोईवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून काही तासातच त्रिकुटाला गजाआड केले आहे. रमेश राठोड (२८) संजयकुमार हिरजन (२५) संजय पवार (३५) असे पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तुळशीराम चव्हाण (३१) असे हत्या झालेल्या घर मालकाचे नाव आहे.

भिवंडीत घरमालकाची हत्या करणाऱ्या भाडेकरूला साथीदारासह अटक

तुळशीराम चव्हाण भिवंडीतील नालापार भागातील बंजारा पाडा येथील घरातून शनिवारी पहाटेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या समोरून पायी जात असतानाच त्यांच्यावर अचानक हल्लेखारांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांची निर्घृणपणे हत्या करून हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच तुळिराम यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

हेही वाचा... बेपत्ता मुलींचा १५ तासात शोध; पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबीय गहिवरले

त्यांनतर भोईवाडा पोलीस आणि भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून कोणताही पुरावा नसताना मोठ्या शिताफीने आरोपींना पकडले. मुख्य आरोपी रमेश राठोडसह संजयकुमार हिरजन, संजय पवार यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता मृत तुळीरामने घरातून बाहेर काढल्याने त्याचा त्याला राग आला होता. त्यामुळे या तिघांनी त्याचे घर बळकवण्यासाठी त्याची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.