ETV Bharat / state

पनवेलमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींचा समावेश - recovered corona patients in panvel

पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी 10 नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील 5, खारघरमधील 3 तसेच नवीन पनवेलमधील 1 आणि खांदा कॉलनी परिसरातील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात 199 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत

corona positive cases found in panvel
पनवेलमध्ये कोरोनाचे दहा नवे रुग्ण
author img

By

Published : May 14, 2020, 8:49 AM IST

नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी 10 नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील 5, खारघरमधील 3 तसेच नवीन पनवेलमधील 1 आणि खांदा कॉलनी परिसरातील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात 199 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यातील 88 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

या क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कामोठ्यामधील रुग्ण संख्या पाहता संपूर्ण कामोठे शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बुधवारीही कामोठेमध्ये पाच रुग्ण आढळले आहेत. कामोठे, सेक्टर-17 मधील 33 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचे पती गोवंडी येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

सोबतच कामोठे, सेक्टर-8 मधील 43 वर्षीय व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. संबधित व्यक्ती पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामोठे सेक्टर- 6 मधील अनंत वाटीका सोसायटीतील 35 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत नायगाव येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले आहे.

याशिवाय कामोठे, सेक्टर-24, मानसरोवर कॉम्लेक्स येथील 61 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या घरातील तीन व्यक्ती याअगोदरच कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातूनच या महिलेला संसर्ग झाला आहे. तसेच कामोठे, सेक्टर-14, येथील 33 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून संबधित व्यक्ती मुंबई महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

खारघरमध्ये 3 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून खारघर, सेक्टर- 8 मधील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती चेंबूरमध्ये टाटा पॉवर येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. खारघर, सेक्टर-21 मधील, ज्ञानसाधना सोसायटीतील 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून हा रुग्ण मुंबईतील धारावी बेस्ट डेपोमध्ये बस वाहक म्हणून कार्यरत आहे.

खारघर, सेक्टर 10, सेनसिटी सोसायटी येथील 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती बँक ऑफ इंडियाच्या माजगाव शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. नवीन पनवेल परिसरातील 45 वर्षीय व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कातून कोरोनाची बाधा झाली आहे, तर खांदा कॉलनीमधील 29 वर्षीय फार्मासिस्टला कोरोना झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.