ETV Bharat / state

तळोजामधील भुयारी मार्ग पाण्याखाली, नागरिकांची गैरसोय - तळोजा भुयारी मार्ग न्यूज

तळोजा परिसरात उभारलेल्या या भुयारी मार्गामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता. पनवेलमध्ये विविध मार्गांवर बांधण्यात आलेले भुयारी मार्ग अशापद्धतीने पाण्याखाली गेल्याने निकामी झाले आहेत. पावसात पाणी साचणे आणि त्यात डासांची उत्पत्ती होऊन आणखीनच नवी समस्या निर्माण होत आहे.

talaja suway news  taloja suway new mumbai  new mumbai rain news  तळोजा भुयारी मार्ग न्यूज  तळोजा भुयारी मार्ग नवी मुंबई
तळोजामधील भुयारी मार्ग पाण्याखाली, नागरिकांची गौरसोय
author img

By

Published : Jul 6, 2020, 4:20 PM IST

नवी मुंबई - तळोजा वसाहतीमधील रेल्वे क्रॉसिंग खालून वाहनांची ये-जा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला भुयारीमार्ग मागील दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्याच वर्षी हा भुयारी मार्ग खुला करण्यात आला होता.

तळोजामधील भुयारी मार्ग पाण्याखाली, नागरिकांची गौरसोय
तळोजा परिसरात उभारलेल्या या भुयारी मार्गामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता. पनवेलमध्ये विविध मार्गांवर बांधण्यात आलेले भुयारी मार्ग अशापद्धतीने पाण्याखाली गेल्याने निकामी झाले आहेत. पावसात पाणी साचणे आणि त्यात डासांची उत्पत्ती होऊन आणखीनच नवी समस्या निर्माण होत आहे. खारघर, कामोठे, नावडे, एमजीएम कामोठे व आता नव्याने तळोजा वसाहत येथे असे हे भुयारीमार्ग पाण्याखाली गेले आहेत. खाडी क्षेत्रात मातीचा भराव घालून सिडको मंडळाने वसाहती वसविल्याने येथे भुयारी मार्गाचा पर्याय निकामी ठरण्याचा अनुभव गाठीशी असतानाही सिडको व रेल्वे प्रशासनाने तळोजा वसाहतीसमोर हा भुयारी मार्ग बांधला आहे. हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने सध्या तळोजा वसाहतीमधील वाहनचालक पेणधर येथील दिवा-पनवेल लोहमार्ग ओलांडून ये-जा करीत आहेत. या भुयारी मार्गातील पाण्याचा आणि प्रशासनाच्या कारभाराचा येथील लोकप्रतिनिधी हरीश केणी यांनी चांगलाच समाचार घेऊन प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.