ETV Bharat / state

कॉंग्रेसच्या निवडून येणाऱ्या मतदारसंघात समाजवादी पक्षाची नेहमीच 'टांग' -सुरेश टावरे - maharastra assembly election 2019

संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघातून कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली गेली. समाजवादी पक्षाकडून मुंबईतील भायखळा परिसरात राहणारे रईस शेख यांना भिवंडी पूर्व मधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

सुरेश टावरे
author img

By

Published : Oct 12, 2019, 9:22 PM IST

ठाणे- काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या मतदार संघात समाजवादी पक्षाने नेहमीच टांग घातल्याचे काम केले आहे, असा आरोप भिवंडी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी केला. माजी खासदार सुरेश तावरे हे भिवंडी पूर्वेतील काँग्रेस उमेदवार संतोष शेट्टी यांच्या गैबी नगर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भिवंडीचे महापौर जावेद दळवी, काँग्रेसचे अनेक नगरसेवक आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरेश टावरे

हेही वाचा- 'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'

अबू आझमी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघातून मतदारांनी 2009 साली निवडून दिले होते. विशेष म्हणजे अबू आझमी भिवंडी आणि गोवंडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, नियमानुसार लोकप्रतिनिधींनी एकाच जागेवर आमदार पद ग्रहण करावे, असा नियम आहे. त्यामुळे त्यांनी भिवंडी पूर्व मधून राजीनामा दिला. त्यामुळे पळ काढल्याची टीकाही यावेळी माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली होती.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत समाजवादी पक्षाला आघाडीने जागा वाटपात झुलत ठेवले. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 2 दिवसापूर्वी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील तीन जागेपैकी एक जागा समाजवादीला सोडावी म्हणून त्यांनी आग्रह धरला होता. मात्र, ऐनवेळी भाजपची साथ सोडून पुन्हा कॉंग्रेसवाशी झालेले संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघातून कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली गेली. समाजवादी पक्षाकडून मुंबईतील भायखळा परिसरात राहणारे रईस शेख यांना भिवंडी पूर्व मधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात जवळपास 40 टक्के मुस्लीम मतदार असल्याने कॉग्रेस, समाजवादी आणि शिवसेना, असा तिरंगी सामना रंगणार आहे.

Intro:किट 319

Body:कॉग्रेसच्या निवडून येणाऱ्या मतदारसंघात समाजवादी पक्षाची नेहमीच 'टांग '... माजी खासदार टावरे यांचा आरोप

ठाणे : काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या मतदार संघात समाजवादी पक्षाने नेहमीच टांग घातल्याचे काम केल्याचा आरोप भिवंडी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी केला, माजी खासदार सुरेश तावरे हे भिवंडी पूर्वेतील काँग्रेस उमेदवार संतोष शेट्टी यांच्या गैबी नगर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आरोप केले, यावेळी व्यासपीठावर भिवंडी चे महापौर जावेद दळवी, काँग्रेसचे अनेक नगरसेवक आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,
माजी खासदार सुरेश टावरे पुढे म्हणाले की, अबू आजमी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघातून मतदारांनी 2009 साली निवडून दिले होते, विशेष म्हणजे अबू आझमी भिवंडी आणि गोवंडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते मात्र नियमानुसार लोकप्रतिनिधींनी एकाच जागेवर आमदार पद ग्रहण करावे असा नियम असल्याने त्यांनी भिवंडी पूर्व मधून राजीनामा देत पळ काढल्याची टीकाही यावेळी माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली,

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत समाजवादी पक्षाला आघाडीने जागा वाटपात झुलत ठेवल्याने समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 2 दिवसापूर्वी नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील तीन जागेपैकी एक जागा समाजवादी ला सोडावी म्हणून त्यांनी आग्रह धरला होता, मात्र ऐनवेळी भाजपची साथ सोडून पुन्हा कॉग्रेसवाशी झालेले संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्व मतदारसंघातुन कॉग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने समाजवादी पक्षाकडून मुंबईतील भायखळा परिसरात राहणारे रईस शेख यांना भिवंडी पूर्व मधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, विशेष म्हणजे या मतदारसंघात जवळपास 40 टक्के मुस्लीम मतदार असल्याने कॉग्रेस, समाजवादी आणि शिवसेना असा तिरंगी सामना रंगणार आहे,

Conclusion:भिवंडी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.