ठाणे: धक्कादायक घटनेमुळे आठ महिन्यांच्या सुखी संसाराचा भयानक अंत झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Suicide of a married woman) आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पूजा करण सोळंके ( वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. (Suicide after eight months of marriage)
पती रागावल्याने आत्महत्या: मृतक पूजा हिचा विवाह आठ महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या करण सोळंके या तरुणाशी झाला होता. त्यातच रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगर येथून मृतक पूजा सोळंके ही आपल्या पती करणसह आली होती. पूजा रक्षा बंधनानिमित्त डोंबिवली पूर्वेतील सांगर्ली गावात असलेल्या जयगुरूदेव अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नणंदेकडे पतीसह आली असता, आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास पूजा कोणत्या तरी व्यक्तीशी इंस्टाग्रामवर चॅटिंग करत होती. यावरून पती करण याने रागातून तिला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या पूजाने इमारतीच्या परिसरात आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
- आकस्मित मृत्यूची नोंद: घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद केली. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती (प्रभारी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिली आहे.
विवाहितेची लेकीसह आत्महत्या: दुसरीकडे आज शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजल्याच्या सुमारास ठाणे शहरातल्या कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जॉय स्क्वेअर येथील विवाहित प्रियंका महेश मोहिते ( वय 26 ) यांना तिच्या बहिणीकडे सातारा येथे भेटण्यासाठी सासरच्या मंडळीने पाठवले नाही. यावरून घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियंकाने इमारतीच्या परिसरात तिच्या लहान मुलगी ध्रुवी (वय 1) हिला घेऊन आत्महत्या केली. यात दोघा माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हट्टेकर करीत आहेत.
हेही वाचा:
- Restrictions On Ajantha Bank : अजिंठा बँकेवर निर्बंध येताच खातेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न
- Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी
- Kota students suicide : कोटामध्ये लातूरसह बिहारच्या विद्यार्थ्याची तणावातून आत्महत्या, दोन महिने कोचिंगमधील परीक्षांवर बंदी लागू