ETV Bharat / state

चौघा माय-लेकांचे मृत्यू प्रकरण : मेव्हणीशी लग्न करून बायकोसह पोरांनाही गमावून बसला?

पोलीस पत्नी रंजना आणि तिच्या तीन मुलांचा शोध घेत होते. मात्र, या चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून श्रीपाद आणि त्याची दुसरी पत्नी सविता यांच्याविरोधात 306 व 498 कलमांतर्गत पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Dec 11, 2020, 8:05 PM IST

ठाणे - तीन महिन्यांपूर्वीच मेव्हणीशी लग्न केल्याने पती-पत्नीमध्ये वाद-विवाद सुरू होऊन नेहमी त्यांच्यात भांडण होत असे. त्यातच दोन महिन्यांपूर्वी अचानकपणे शेतात जाते असे सांगून पत्नी सोबत ३ मुलांनाही घेऊन गेली. मात्र, त्या रात्री ती आणि मुले परत आलीच नाहीत. त्यामुळे पतीने पडघा पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबरला पत्नी आणि ३ मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलीस पत्नी रंजना आणि तिच्या तीन मुलांचा शोध घेत होते. मात्र, या चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून श्रीपाद आणि त्याची दुसरी पत्नी सविता यांच्याविरोधात 306 व 498 कलमांतर्गत पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेव्हणीशी लग्न करून बायकोसह तीन पोरांनाही गमावून बसला?

गावापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गण्याच्या डोंगरावर जंगलामध्ये एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन तीन मुलांसह आईने आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या होती, की हत्या करण्यात आली? याचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत. तर श्रीपत बच्चू बांगारे आणि त्यांची दुसरी पत्नी सविता बांगारे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोघांची नावे आहेत. पहिली पत्नी रंजना (वय ३०), मुलगी दर्शना (वय १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत.

दोन महिन्यांपासून होते चौघेही मायलेक बेपत्ता

दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून पती आणि त्याची दुसरी पत्नी सविता बांगारे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक उपचारांसाठी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दीर लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला अन्...

भिवंडी तालुक्यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ लाकडे आणण्यासाठी गेला होता. त्याला एका झाडावरून दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने पहिले असता झाडाला सडलेल्या अवस्थेत चार मृतदेह आढळून आले. मृतदेहांच्या अंगावरील कपड्यांमुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पडघा पोलीस ठाण्याच्या एका पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तर फॉंरेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. तब्बल दोन महिन्यांपासून चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वीही घडली होती अशीच घटना..

काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या जंगलात तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र, पोलीस तपासाअंती या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी, अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अशाच प्रकारे झाडाला सडलेल्या व लटकलेल्या अवस्थेत चारही माय-लेकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.