ठाणे Thane School News : ठाण्यातल्या एका शाळेमध्ये जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं गेलं नाही. यामुळं पालकांचा उद्रेक या ठिकाणी पाहायास मिळाला. राज्य सरकारच्या नियमानुसार या शाळेमध्ये कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप, पालकांनी केलाय. यावेळी पालकांनी संपूर्ण प्रक्रियाच रोखून धरली होती. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत हे संपूर्ण प्रकरण शांत केलं.
शाळेसमोर केलं आंदोलन : एखाद्या विद्यार्थ्यांची शालेय फी भरली गेली नाही तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली पाहिजे. परंतु ठाण्यातील एका शाळेमध्ये चक्क परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना पेपरला बसू दिलं नाही. यानंतर पालकांचा संताप वाढला आणि त्यांनी शाळेसमोर आंदोलन केलं. हा सर्व प्रकार सुरू असताना देखील शाळेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, पालक जास्त आक्रमक झाले. त्यांनी शाळेचं कार्यालय गाठलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ठाणे पोलिसांनी मध्यस्ती केली. प्रशासनाला पालकांसोबत बोलणी करायला भाग पाडलं.
साडेतीनशे विद्यार्थ्यांसाठी राजकीय पक्ष झाले गोळा : स्थानिक नेत्यांनी या प्रकारात लक्ष देत शाळेच्या प्रशासनाला धारेवर धरलं. पालकांच्या आंदोलनानंतर शेवटी शाळेनं परीक्षाच पुढे ढकलली. आता या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे, असं शाळेकडून सांगण्यात आलंय.
शाळा की वसुलीचे ठिकाण : या शाळेमध्ये टिकली लावल्यानंतर दंड, उशिरा आल्यानंतर दंड, अशा प्रकारचे अनेक दंड विद्यार्थ्यांकडून आकारले जात होते. या विरोधात पालकांनी अनेकदा तक्रार देखील केल्या होत्या. मात्र आता या सर्व दंडांची पुन्हा एकदा चौकशी करून शाळा प्रशासनावर कारवाई केली जाणार आहे, असं आश्वासन युवा सेनेच्या नेत्यांनी दिलं आहे.
हेही वाचा -
- आता वार्षिक परीक्षेला पाचवीसाठी 18 आणि आठवीसाठी 21 गुण सक्तीचे; अशी असणार परीक्षा पद्धती
- नामांकित शाळांचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे राखीव 226 कोटींचे अनुदान रोखले, सरकार म्हणतं कोरोना काळात काय शिक्षण दिलं?
- Journey of School Students in Buldhana : शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहनावर लोंबकळत विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास; व्हिडिओ व्हायरल