ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 'विद्यार्थी भारती'ने साजरा केला शिक्षक दिन

author img

By

Published : Jan 3, 2020, 11:31 PM IST

विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी भारतीच्या प्रतिनिधींनी शिक्षकांना सावित्री बाई फुलेंची प्रतिमा व फुल देऊन सदिच्छा दिल्या. आज प्रगतीच्या क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या महिलांच्या मुक्तीला जन्म देणारी सावित्रीमाई हीच खरी शिक्षिका आहे. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

savi
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 'विद्यार्थी भारती'ने साजरा केला शिक्षक दिन

ठाणे - क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'विद्यार्थी भारती'ने आज( 3 जानेवारी) शिक्षक दिन साजरा केला. विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी भारतीच्या प्रतिनिधींनी शिक्षकांना सावित्री बाई फुलेंची प्रतिमा व फुल देऊन सदिच्छा दिल्या.

हेही वाचा - अहिल्यादेवी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सावित्रीबाई फुलेंना अनोखे अभिवादन

आज प्रगतीच्या क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या महिलांच्या मुक्तीला जन्म देणारी सावित्रीमाई हीच खरी शिक्षिका आहे. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसह विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकांसह शिक्षक वर्गाला सावित्री बाई फुलेंची प्रतिमा व फुल देऊन सदिच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी बिर्ला महाविद्यालय, महेंदरसिंग काबूलसिंग महाविद्यालय, सीएचएम महाविद्यालय आणि कीर्ती महाविद्यालय येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व मुख्याध्याकांना भेटी देऊन हा आगळावेगळा शिक्षक दिन साजरा केला.

Intro:kit 319Body:सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थी भारतीचा आगळावेगळा शिक्षक दिन साजरा

ठाणे : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी भारतीने शुक्रवारी आगळावेगळा शिक्षक दिन साजरा केला
मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे नाव मानले जाते. आज प्रगतीच्या क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या महिलांच्या मुक्तीला जन्म देणारी सावित्रीमाई हीच आमची खरी शिक्षिका आहे. त्यांची जयंती हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याच्या मागणीसह विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाला सावित्री बाई फुलेंची प्रतिमा व फुल देऊन सदिच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी बिर्ला महाविद्यालय, महेंदरसिंग काबूलसिंग महाविद्यालय, तसेच सीएचएम महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व मुख्याध्याकांना भेटी देऊन आगळावेगळा शिक्षक दिन साजरा केला.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.