ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी(23 जानेवारी) राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना 'बारकोड' असलेले पासेस वाटण्यात आले आहेत.
गुरुवारी होणाऱ्या अधिवेशनात अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार आणि काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ५० हजार पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थिती राहणार आहेत. अधिवेशनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पासवर सुरक्षेच्या दृष्टीने एक बारकोड लावण्यात आला आहे, अशी माहिती मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
हेही वाचा - राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले
या पासेसवर महाराष्ट्राचा नकाशा हा भगवा करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेची वाटचाल उद्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अधिवेशनाचा दिवस आम्ही एक सण म्हणून उत्साहात साजरा करणार असल्याचेही अविनाश जाधव यांनी सांगितले.