ठाणे - मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे उद्या नव्या सभापतींची निवड होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत वर्चस्व प्राप्त करण्याकरिता भाजप विरुद्ध भाजपच वाद रंगण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पाच बारवर महापालिकेची कारवाई
भाजपकडून तीन अर्ज, तर सेनेकडून एक
मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजप पक्षाची एक हाती सत्ता आहे. पालिकेच्या मागील स्थायी समिती सभापतीचे कार्यकाळ २८ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. त्यामुळे, नव्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. या करीता आज दुपारी ११ ते १ दरम्यान नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. तर, आज भाजपकडून दिनेश जैन, राकेश शहा, सुरेश खंडेलवाल असे तीन जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर, सेनेकडून कमलेश भोईर यांनी अर्ज दाखल केला आहे. मिरा भाईंदर भाजप पक्षातील अंतर्गत वाद चवाट्यावर आल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
सभापती पदासाठी भाजपमध्ये वाद
मीरा भाईंदरमध्ये भाजपमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे नेमके नवीन स्थायी समिती सभापती कोण होणार? हे उद्या स्पष्ट होईल. मात्र, सध्या भाजपचे दिनेश जैन सभापती होणार, अशी चर्चा मीरा भाईंदरमध्ये रंगली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे १०, तर महाविकास आघाडीचे ६ सदस्य आहेत. मात्र, भाजपमधील अंतर्गत वादामुळे उमेदवारी प्राप्त करण्याकरिता घोडदौड सुरू झाली आहे.
हेही वाचा - धक्कादायक ! हळदी समारंभांतील हत्येचा उलगडा; 'त्या' महिलेवर अनैतिक संबधातून गोळीबार