ETV Bharat / state

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा..! विद्यार्थिनीवर अत्याचारासह अमानुष मारहाण; क्रीडा प्रशिक्षकाला बेड्या

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीतील मानपाडा परिसरात घडली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ( State Level Competition ) गेलेल्या मुलीशी कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर इतरांशी बोलू नको असे म्हणत मारहाण केली तसेच अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून मुलीने मित्रासोबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नराधम क्रीडा प्रशिक्षक अटकेत असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Apr 25, 2022, 7:29 PM IST

ठाणे - एका क्रीडा प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचारासह अमानुष मारहाण केली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना डोंबिवलीतील मानपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामेश्वर पाठक ( वय 31 वर्षे), असे अटक केलेल्या क्रीडा प्रशिक्षकाचे नाव ( Sports Coach ) आहे.

तरुणीवर शारिरिक अत्याचार करत, फोटो व्हायरल करण्याची धमकी - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 वर्षीय पीडित तरुणी, डोंबिवली परिसरात राहते. 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली ( State Level Competition ) होती. त्यावेळी तिचे कोच असलेल्या आरोपी रामेश्वर पाठक याने त्या पीडित तरुणीशी ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक संबध ठेवले. त्यातच काही महिन्यानंतर या दोघांच्या प्रेमाचे नातेसंबंध व्यवस्थित सुरू असताना 2019 नंतर दोघांमध्ये अचानक खटके उडायला लागले. त्यातच पीडित तरुणी दुसऱ्या मुलांशी बोलत असल्याचे पाहून आरोपी रामेश्वर तिला मारहाण करायचा, अशीच मारहाण 18 मार्च, 2022 रोजी रामेश्वरने एका कारणावरुन लोखंडी रॉडने पीडित मुलीला अमानुष मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याने तरुणीवर शारीरिक अत्याचार करत अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली.

आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत - आरोपीच्या अत्याचार व मारहाणीला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या एका मित्राच्या सहायाने रविवारी (दि. 24 एप्रिल) रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रामेश्वर पाठकविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज (दि. 25 एप्रिल) संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास मानपाडा पोलीस ( Manpada Police ) करीत आहेत.

हेही वाचा - Firing On Builder : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.