ETV Bharat / state

भिवंडीहुन उत्तर प्रदेशमधील आझमगढला जाणारी विशेष श्रमिक ट्रेन रवाना - विशेष श्रमिक ट्रेन रवाना

भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी उत्तरप्रदेश आझमगढसाठी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली.

special-labor-train
विशेष श्रमिक ट्रेन रवाना
author img

By

Published : May 28, 2020, 8:29 PM IST

ठाणे - लॉकडाऊनमुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी उत्तरप्रदेश आझमगढसाठी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेनमधून 1590 प्रवासी रवाना झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार नगरी भिवंडीत आजही हजारो परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. अशा कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी भिवंडीहून उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्यातील मजुरांना घेऊन विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेन मधून 1590 प्रवासी बिहार मधूबनीसाठी रवाना झाले. यापूर्वी अशाचप्रकारे बिहार मधूबनीसाठी 9 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर त्याआधी गोरखपूर, जयपूर, आणि पटनासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह मनपा व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत यावेळी कामगारांना निरोप दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.