ETV Bharat / state

कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, एकनाथ शिंदेंचा निर्णय

author img

By

Published : May 5, 2020, 9:24 AM IST

कोरोनाशी लढा देण्यासाठी ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेला दिले. सोबतच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली.

कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय

ठाणे - कोरोनाशी लढा देण्यासाठी ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन कोरोना प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले.

इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करून आवश्यक उपचार केले जावेत. तसेच रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. सोबतच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.