ETV Bharat / state

लॉकडाऊन : नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केल्या इमारती बंद !

'आमच्या सोसायटीमध्ये कोणी यायचे नाही आणि सोसायटीतून कोणी बाहेर पडायचे नाही' अशा पवित्र्यात ठाण्यातील कळवा भागातील अनेक सोसायट्यांनी लॉकडाऊनला सफल करण्याचा विडा हाती घेतला आहे.

author img

By

Published : Mar 25, 2020, 8:54 AM IST

societies building closed to prevent corona virus outbreak
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोसायट्या केल्या बंद

ठाणे - 'आमच्या सोसायटीमध्ये कोणी यायचे नाही आणि सोसायटीतून कोणी बाहेर पडायचे नाही' अशा पवित्र्यात ठाण्यातील कळवा भागातील अनेक सोसायट्यांनी लॉकडाऊनला सफल करण्याचा विडा हाती घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याचबरोबर गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांच्या कामाचा ताण थोडा कमी व्हावा, यासाठी म्हणून काही सोसायटी सदस्यांनी पुढाकार घेत हा सरकारात्मक निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोसायट्या केल्या बंद...

हेही वाचा... ''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केला जात आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी देशातच संचारबंदी लागू केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. यातच पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, त्याचबरोबर करोनाचा प्रादुर्भाव टाळता यावा यासाठी ठाण्यातील कळवा भागातील सोसायटी सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

इमारतीतील कोणत्याही सदस्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या उद्देशाने कळवा भागातील सोसायटींनीपूर्ण सोसायट्या बंद केल्या आहेत. त्याच बरोबर काही नियम केले आहेत. 'कोणीही सोसायटीमध्ये येणार नाही. किंवा कोणी सदस्या बाहेर जाणार नाही. ज्यांना काही कामानिमित्ताने सोसायटीमधून बाहेर जायचे आहे, त्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे बाहेर जाण्याचे कारण पटले नाही तर सोसायटी बाहेर जाण्यास त्यांना मज्जाव केला जाईल' असे नियम सोसायट्यांनी बनवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.