ETV Bharat / state

Cannabis Smuggler Arrested : ठाण्यात ऑटो रिक्षातून गांजाची तस्करी; १५ किलो गांजासह तस्कर अटक

१५ किलो गांजा घेऊन रिक्षाद्वारे ( Cannabis Smuggling By Auto Rikshaw ) त्याची तस्करी करणाऱ्या तस्कराला भिवंडी गुन्हे शाखेच्या ( Bhiwandi Crime Branch ) पोलिसांनी सापळा रचून अटक केली ( Cannabis Smuggler Arrested ) आहे. एकूण २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा हा गांजा आहे.

ऑटो रिक्षातून गांजाची तस्करी; १५ किलो गांजासह तस्कर अटक

author img

By

Published : Apr 15, 2022, 5:25 PM IST

ठाणे : ऑटो रिक्षातून १५ किलो गांजाची तस्करी ( Cannabis Smuggling By Auto Rikshaw ) करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तस्कराला भिवंडी गुन्हे शाखेच्या ( Bhiwandi Crime Branch ) पोलिसांनी सापळा रचून अटक केली ( Cannabis Smuggler Arrested ) आहे. दुर्गा राजेंद्र साह (वय ४७ रा. रांजणोली, भिवंडी ) असे अटक तस्कराचे नाव आहे.

२ लाख ४१ हजार ५३० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत : भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील रांजणोली गांव, ते कमानीचे रोडवर एका अॅटो रिक्षातुन प्रवासी म्हणून एक तस्कर गांजा हा अमली पदार्थ विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्रीच्या सुमारास रांजणोली नाका परिसरात सापळा रचून तस्कर दुर्गा राजेंद्र साह याला रिक्षातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून दोन निळया रंगांच्या प्लास्टिक पिशव्यांमधून एकुण वजन १५ किलो ३६ कि.ग्रॅम वजनाचा २ लाख ३० हजार ४०० रु किमतीचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४१ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

तस्कर मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी : याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा तस्कर मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी आहे. त्याने हा गांजा कुठून व कोणाला विक्रीसाठी घेऊन जात होता, याचा तपास कोनगाव पोलीस करत आहेत. सदर कारवाई सपोनि विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, उपनिरीक्षक रमेश शिंगे, रामसिंग चव्हाण, हनुमंत वाघमारे, रविंद्र पाटील, हवालदार मंगेश शिर्के, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, पोलीस नाईक सचिन जाधव, साबिर शेख, रंगनाथ पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत निकुंभ यांच्या ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

हेही वाचा : कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून केली मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.