ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोनाच्या 63 नव्या रुग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

नवी मुंबईत आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशात आज आणखी 63 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 49 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय आज तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.आत्तापर्यंत नवी मुंबईत 4072 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते.

navi mumbai corona update
नवी मुंबईत कोरोनाच्या 63 नव्या रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jun 16, 2020, 8:16 PM IST

नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नवी मुंबईत आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अशात आज आणखी 63 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 49 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय आज तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 4072 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत शहरातील 15 हजार 487 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 892 जण निगेटिव्ह आले असून 534 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहाणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4061 इतकी आहे.

आज 63 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात तुर्भेमधील 8, बेलापूरमधील 6, कोपरखैरणेमधील 13, नेरुळमधील 8, वाशीतील 4, घणसोलीमधील 11, ऐरोलीमधील 10, दिघ्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. यामधील 24 स्त्रिया व 39 पुरुष आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत 2355 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. तर, आज बेलापूरमधील 11, नेरूळमधील 3, वाशीमधील 6, तुर्भेमधील 4, कोपरखैरणेमधील 9, घणसोलीमधील 1, ऐरोलीमधील 9, दिघा 6 अशा एकूण 49 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये 16 स्त्रिया आणि 33 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 1571 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.