ETV Bharat / state

Mangala Gauri started : श्रावणाला सुरुवात होताच नवविवाहीतांची मंगळागौर जोमात, शिकवणी वर्ग सुरु

कोरोना मुळे गेली दोन वर्ष बऱ्याच जणांची मंगळागौर ही घरीच झाली. तर काही महीलांनी ती गृप सोबत ऑनलाईन साजरी केली. बंदी उठल्याने, आता श्रावण सुरु झाल्याने, नवविवाहीत महिला सगळीकडे (Shravan begins the newlyweds celebrated) प्रत्येक मंगळवारी मंगळागौर (Tuesday Mangala Gauri) साजरी करतात. (Mangala Gauri started) तर काही ठीकाणी त्याचे शिकवणी वर्ग (Mangala Gauri teaching classes begin) देखील घेतले जातात. ठाणे येथे मंगळागौर कशी साजरी केल्या जाते? काय तयारी असते? याची महीती सृजनसख्या मंगळागौरी गृपच्या अपर्णा मोडक यांनी दिली.

Mangala Gauri
मंगळागौर
author img

By

Published : Aug 3, 2022, 2:07 PM IST

ठाणे : मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी (Tuesday Mangala Gauri) नवविवाहीत महिलेने (Shravan begins the newlyweds celebrated) लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी, या हेतूने ही पूजा केली जाते. कोरोना मुळे गेली दोन वर्ष बऱ्याच जणांची मंगळागौर ही घरीच झाली. तर काही महीलांनी ती गृप सोबत ऑनलाईन साजरी केली. आता श्रावण सुरु झाल्याने, सागळी कडे प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी (Mangala Gauri started) केल्या जात आहे.

मंगळागौरचे सादरीकरण करतांना महीला

कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर, प्रत्यक्ष प्रेक्षकांमध्ये सहभागी होऊन साजरी होणारी ही यंदाची मंगळागौर आमच्यासाठी खूपच आनंदाची आणि भाग्याची आहे. नव्या-जुन्यां परंपरेचा मेळ गुंफून सृजन सख्या मंगळागौरीचा हा खेळ गेल्या सात वर्षांपासुन खेळत आहे. मागच्या वर्षी मंगळागौरीचे खेळ ऑनलाईन होते. परंतू यंदा प्रत्यक्ष मंगळागौर खेळासाठी १२ते१३ ठिकाणी बुकींग झाले (Mangala Gauri teaching classes begin) आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे. अशी माहीती सृजनसख्या मंगळागौरी गृपच्या अपर्णा मोडक यांनी दिली.

नवविवाहित महिलांनी श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करायचे आणि रात्री देवीची आरती म्हणून पारंपरिक मंगळागौर खेळ खेळण्याचा प्रघात आहे. या खेळाविषयी माहिती देतांना, घरातील स्वयंपाक घरात जी साधने तसेच भाज्यांच्या वापर होतो त्याची ओळख या खेळाच्या माध्यमातून दिली जाते. उदाहरणार्थ फुगड्या चे आठ ते दहा प्रकार आहेत. यामध्ये तवा फुगडी, कमळ, फुलपाखरू फुगडी. तसेच भाज्यांशी ओळख देणारे अवल्या वेचू की गवल्या वेचू, लाट्या बाई लाट्या, तर सासू सूनेचा तुझी आई मोठी की मोठी आई, आदी ५०ते६० खेळ यावेळी खेळत असल्याचे अपर्णा यांनी सांगितले.

पूर्वतयारी महत्वाची : या खेळाच्या पूर्व तयारीसाठी सराव करणे खूप आवश्यक असते. शरीराची उर्जा वाढवण्यासाठी गृप मधील नौकरी करणाऱ्या महिला, घर सांभाळून दिवसाला दोन तास सरावासाठी देतात. साधारणपणे मे अखेर पासून सरावाला सुरवात करत असल्याचे त्या सांगत आहेत. श्रावणात दिवसाला दोन खेळांच्या सत्रांचे बुकींग त्या घेतात. सृजनसख्या मंगळागौरी गृपच्या अपर्णा मोडक या वीस वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहेत.

हेही वाचा : Ultra-Processed foods : अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो - अभ्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.