ETV Bharat / state

Shiv Sena Dasara Melava : शिवतीर्थावर असणारा दसरा मेळावा रडगाणं गाणारा असेल-मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava : शिवसेना पक्षातील दोन गटात दसरा मेळावा कुठं होणार यावरुन वाद सुरू आहे. आता शिवाजी पार्कवरुन शिंदे गटानं माघार घेतल्यानंतर आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Shiv Sena Dasara Melava
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 9:56 AM IST

ठाणे Shiv Sena Dasara Melava: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ( Eknath Shinde Vs Uddhav Thackeray ) यांच्यात दसरा मेळावा कुठं होणार, यावरुन मोठा वाद सुरू आहे. यावर मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यावरुन माघार घेत वाद टाळला आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 2022 चा शिंदे गटाचा मेळावा हा बांद्रा कुर्ला संकुलात पार पडला होता. मात्र या वर्षी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्यानं संघर्ष पेटणार असं दिसत असताना शिंदे गटानं माघार घेत आझाद मैदानात दसरा मेळावा घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेत संघर्ष : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कोणत्या गटाचा दसरा मेळावा कुठं होणार यावरुन वाद रंगताना पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. यानंतर ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेत शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी काबीज केली. तर 2022 चा शिंदे गटाचा मेळावा हा बांद्रा कुर्ला संकुलात पार पडला. यावर्षी देखील दसरा मेळावा कोणत्या गटाचा नेमका कुठं होणार, असा प्रश्न होता. यासाठी दोन्ही गटांनी शिवतीर्थावर आपला मेळावा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अर्ज केले. यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी अखेर ठाकरे गटानं मिळवली. शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी आधी चर्चगेट जवळील क्रॉस मैदान निश्चित करण्यात आलं. मात्र आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचं शिक्कामोर्तब खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

बाळासाहेबांचे विचार आझाद मैदानावर ऐकायला मिळतील : ठाण्यातील दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर आझाद शिवसैनिकांचा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना आझाद करण्याचं आणि शिवसेना धनुष्यबाण वाचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. म्हणून हा आझाद मेळावा असल्याचंदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर शिवतीर्थावर असणारा दसरा मेळावा रडगाणं गाणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मूळ बाळासाहेबांचे विचार हे आझाद मैदानावर ऐकायला मिळतील. हा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती असा असेल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यात कोणाची सभा रेकॉर्ड ब्रेक होते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे :

  • जिल्हाप्रमुख, आमदार, खासदारांना 5 हजार कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट
  • जाण्या -येण्याच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाप्रमुख आणि आमदारांना बस व्यवस्थापकाच्या क्रमांकासह पार्किंग व्यवस्थेचे मार्गदर्शन
  • रेकॉर्ड ब्रेक सभा करण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश

हेही वाचा :

  1. Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार; मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर....
  2. Uddhav Thackeray VS Eknath Shinde : शिंदे गटानं शिवाजी पार्कचा आग्रह का सोडला? अनिल परब यांनी 'हे' सांगितले कारण
  3. Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्र प्रकरण ; 20 तारखेला होणार पुढील सुनावणी, आमदार म्हणाले . . .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.